Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आता तुम्हीच सांगा यामध्ये चूक नेमकी कुणाची?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये चूक दोन्ही बाजूंनी झाल्याचे समोर आले आहे; ज्यामधून एका वाहनचालकाचा वेग आणि समोरील वाहनचालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर गाड्यांची वर्दळ दिसत आहे. यावेळी सिग्नल असल्यामुळे डाव्या बाजूच्या कार थांबल्या आहेत आणि उजव्या बाजूची वाहतूक सुरू आहे. अशातच सिग्नल सुटताच डाव्या बाजूची वाहतूक सुरू होते आणि उजव्या बाजूला सिग्नल लागतो. मात्र, सिग्नल असूनही काही कार पुढे येतात; परंतु कारचालकांनी वेळीच ब्रेक दाबल्यानं मोठा अपघात टळल्याचं दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवून इतरांची सुरक्षा धोक्यात घातल्यामुळे नेटकरीही संतापले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. roadsafetycontent नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे. प्रत्येक वेळी नशीब एवढं बलवत्तर असेलच, असं नाही. रस्ते अपघात आयुष्यात प्रत्येकाला सावरण्याची संधी देत नाही. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car accident shocking video goes viral on the internet video goes viral srk