Bike Brutal accident: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण अनेकदा वाचलं ऐकलं असेल. म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित प्रवास करावा, असं सांगितलं जातं. तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात.
सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.
गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, हेल्मेट घालावं, फोनचा वापर करू नये, अशा सुरक्षिततेच्या सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. एक अपघात आपलं आयुष्य संपवू शकतो हेदेखील आजकाल अनेकांना कळत नाही.
रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सध्या सोशल मीडियावर एका अशाच अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्याच एका दुचाकीचा आणि कारचा भयंकर अपघात झाला आहे. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…
भयंकर अपघात
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधला भयंकर अपघात पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक कार आपल्या रस्त्याने व्यवस्थित जात असते. समोरून श्वान येतो म्हणून ती स्लो होते आणि थांबते. पण मागून वेगात एक दुचाकीचालक येत असते. तो इतक्या वेगात येतो की एकदम पुढच्या कारवर आदळतो. कारवर तो इतक्या जोरात आदळतो की, कारच्या रुफवर येऊन पुढे काचेवर येऊन पडतो. त्यामुळे ती काचदेखील फुटून त्याचे तुकडे तुकडे होतात.
सोशल मीडियीवर व्हायरल झालेला व्हिडीओ @scroll_dood या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ८ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याला कारचे पैसे द्यावे लागतील, दुचाकी चालवताना तो झोपला होता का?” तर दुसऱ्याने “याला म्हणतात स्वत:हून मृत्यूच्या जाळ्यात अडकणे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “त्याचं लक्ष त्याच्या फोनमध्ये आहे असं दिसतंय.”