Car blast at petrol pump: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आपण अनेकदा अपघातांचे व्हिडीओही पाहिले असतील. अशा अपघातांत काही जण आपला जीव गमावतात; तर काहींना जीवदान मिळतं. भररस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडत असतात.
अनेकदा पेट्रोल पंपावरदेखील असे अपघात होताना दिसतात. म्हणून पेट्रोल पंपावर अनेकदा पेट्रोल भरताना फोन वापरू नये किंवा सीएनजी भरताना कारमध्ये बसू नये अशा सूचना दिल्या जातात. अशा वेळेस सावधगिरी बाळगून वेळीच योग्य ते पाऊल उचलल्यास संकट टळू शकतं. सध्या याच स्वरूपाची एक दुर्घटना पेट्रोल पंपावर घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या दुर्घटनेमध्ये एका कारचा अचानक स्फोट होतो. नेमका स्फोट कसा होतो आणि काय घडतं, ते जाणून घेऊ या…
कारचा स्फोट झाला अन्…
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी एक कार थांबलेली असते आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी कारमध्ये सीएनजी भरत असतो. त्यादरम्यान कारचालक गाडीच्या समोर येऊन उभा राहतो. तेव्हा अचानक गाडीचा स्फोट होतो आणि गाडीचे तुकडे तुकडे होतात. गाडीचा स्फोट होताच कर्मचारी आणि कारचालक गाडीपासून लांब होतात. नशिबानं या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @successdiary025 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “गाडी में सीएनजी भरवाते समय कभी अंदर ना बैठे” (गाडीत सीएनजी भरत असताना कधीच आत बसू नये), अशी कॅप्शन देण्यात आली आहे. काही तासांतच या व्हिडीओला तब्बल ५१ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट्स करीत लिहिलं, “म्हणूनच सीएनजी भरताना पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी कधीच कारमध्ये बसू देत नाहीत.” तर दुसऱ्याने, “नशीब तो वाचला”, अशी कमेंट केली.
हेही वाचा… आता एकमेकींचा जीवच घेतील! कानाखाली मारलं, झिंज्या उपटल्या अन्…, तरुणींचा भररस्त्यात राडा, पाहा VIDEO