सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काहीजण तर प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. त्यात स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची पर्वा न करता केवळ मनोरंजन आणि प्रसिद्धीवर लक्ष केंद्रित केले जाते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती चारचाकी गाडीतून स्टंट करताना दिसत आहेत. पण त्यांचा हा स्टंट चांगलाच महागात पडल्याच दिसुन येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही जण मैदानामध्ये चारचाकी गाडी वेगाने गोल फिरवत स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एक जण लांबून या स्टंटचा व्हिडीओ काढत आहे. भरधाव वेगाने गाडी गोल फिरवत असताना गाडीचा तोल जातो आणि गाडीतील सर्वजण वाईट पद्धतीने खाली पडतात. यातील काही जण जखमी झाल्याची शक्यता आहे.

Video : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ १८० किमी प्रतितास वेगाने धावली; रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ चर्चेत

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा – कापलेल्या झाडाने उगवला सूड; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा भन्नाट व्हिडीओ पाहाच

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काही जणांनी अशा प्रकारचे स्टंट करण्याआधी स्वतःच्या जीवाचा विचार करा असा सल्ला दिला आहे. फक्त प्रसिद्धीसाठी कोणतीही काळजी न घेता स्टंट करणाऱ्यांनी हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवावे. केवळ चित्रपटात बघून, आवडत्या कलाकाराला स्टंट करताना बघून काही जण त्यांचे अनुकरण करतात. पण चित्रपटात, शूटिंगमध्ये आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते हे सर्वसामान्यांना माहित नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्टंट करण्यापुर्वी त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car collapses during stunt people sitting on it falls badly video goes viral pns