Mumbai Road Rage: सोशल मीडियाच्या दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ येथे पाहायला मिळतात की, जे आपलं मनोरंजन करतात. यामध्ये अनेक व्हिडीओ भांडणाचे सुद्धा असतात.
रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना कोणासोबत कधी काय घडेल सांगता येत नाही. रोज कशावरून तरी भांडणं, मारामारी, अपघात घडतच असतात. यात अनेकदा रस्त्यावरून वाहन चालवण्यावरून वाहन चालकांमध्ये नेहमीच वाद होत असतात. पण, हे वाद अनेकदा इतक्या टोकाला जातात की, त्याचे हाणामारीत रुपांतर होते. अशातच मुंबईच्या रस्त्यावर दोन वाहन चालकांमधील वादाची घटना समोर आली आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात, एक दुचाकीस्वार कार चालकाला शिवीगाळ करताना आणि हल्ला करताना दिसत आहे, ज्यामुळे रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होते.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक कारचालक आणि बाईकचालकाचं भांडण होताना दिसत आहे. दुसऱ्याच मिनिटाला बाईकस्वार कारच्या बाजूला येऊन त्याला शिविगाळ करू लागतो. कारचालकाबरोबर त्याचा एक लहान मुलगाही कारमध्ये असतो. हा व्हिडीओ मागून येणाऱ्या एका बाईकस्वाराने शूट केला आहे. यादरम्यान, दोघांच्या भांडणात हा बाईकस्वार पडतो. आणि म्हणतो “कारचालकाबरोबर त्याचा लहान मुलगा आहे कृपया भांडू नका आणि त्या लहान मुलासमोर असल्या शिव्या देऊ नका.” तरीही तो बाईकस्वार ऐकत नाही आणि याला वैतागून कारमध्ये बसलेला माणूस बाहेर येतो. आणि दोघांमध्ये जारदार भांडण सुरू होतं. तेवढ्यात आजूबाजूला गर्दी जमा होते. आणि सगळी लोकं दोघांचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतात.
हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “ओव्हरटेकिंगवरून दोघांमध्ये भांडण झालं, एका बाइकरने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “लोकांमध्ये आता सहनशीलता कमी झाली आहे, “बाजूला गाडी लावून काय ते भांडत बसा, यांना वेळेची किंमतच नाही” तर दुसऱ्याने “पण बाइक चालक बरोबर सांगत होता” तर एकजण कमेंट करत म्हणाला, “जर प्रवास करताना माणसं कॅमेराचा वापर करत नसती तर एवढी भांडण होतात हे आपल्याला कधीच कळलं नसतं.” तर एकाने कमेंट करत “बाईलकामासाठी आदर” अशी कमेंट केली.