Car driver fights with delivery boy: गेल्या काही वर्षांपासून रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यातले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे अनावधानाने होतात. अशा अपघातांमध्ये अनेकदा लोकांमध्ये भांडण होतं आणि हे भांडण कधी कधी इतक्या टोकाला जातं की, त्याचं रूपांतर मारामारीत होतं. काही जण रागाच्या भरात दुसऱ्याचा अपमानदेखील करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कारचालक एका डिलिव्हरी बॉयचे पार्सल रस्त्यावर फेकून देतो. नेमकं काय घडलं काय? जाणून घेऊ या…

हेही वाचा… अरे जनाची नाही, मनाची तरी…, तरुणीने भररस्त्यात साडी सोडली अन् पुढे ‘असं’ काही झालं की…, VIDEO झाला व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी बॉय आपल्या बाईकरून आपल्या रस्त्याने जात आहे. अचानक त्याची बाईक खाली पडते. एवढ्यातच मागून एक कारचालक रागारागात येतो आणि त्या बाईकचालकाकडे असलेली सगळे पार्सल्स रस्त्यावर फेकून देतो आणि त्याच्याशी भांडू लागतो. या सगळ्यात त्या डिलिव्हरी बॉयच्या बाजूने एक वयोवृद्ध माणूस उभा राहतो आणि सगळ्यांना समजावतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @karan_vishwakarmax या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, “कारवाले स्वत:ला काय समजतात. सगळ्यांची इज्जत करा” अशी कॅप्शन त्याला दिली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला तब्बल १.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… मुंबई लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे, प्रवाशांसमोर केलं ‘असं’ काही की…, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा VIDEO व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “जे लोक दुसऱ्यांना कमी लेखतात, ते खऱ्या आयुष्यात काहीच करू शकत नाहीत.” तर दुसऱ्यानं अशी कमेंट केली की, “डिलिव्हरी बॉयबरोबर असे करू नका. कारण- ते त्यांच्या कुटुंबाचे पोट भरण्याचे काम करतात.” एक जण कमेंट करीत म्हणाला, “हा व्हिडीओ नक्कीच व्हायरल झाला पाहिजे… त्या कारवाल्या माणसाला त्याच्या कृत्याबद्दल नक्कीच पश्चात्ताप झाला पाहिजे.”

हेही वाचा… अरे जनाची नाही, मनाची तरी…, तरुणीने भररस्त्यात साडी सोडली अन् पुढे ‘असं’ काही झालं की…, VIDEO झाला व्हायरल