रस्त्यावर कधी काय घडेल काही सांगू शकत नाही. रोज काहीतरी नवीन ड्रामा, भांडणं, अपघात, घडत असतात. रस्त्यावर गाडी चालवताना लोकांची अनेक भांडणं होतात. ही भांडणं अनेकदा मारामारी पर्यंतही पोहोचताना पहायला मिळतात. अशातच रस्त्यावर वाद झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. ओव्हरटेकच्या वादातून एका कारचालकाने मुद्दाम बुलेटला टक्कर दिली आहे. एका धक्क्याने बुलेट पडेल हे शक्यच नाही. असंच काहीसं घडलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून बुलेट प्रेमींना व्हिडीओ पाहून हसू अनावर झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्त्यातच एका कार चालकाचं आणि बुलेट चालकाचं भांडण झालं. या रागातून कार चालकानं बुलेट वाल्याला जोरात धडक दिली. एवढी जोरात धडक देऊनही बुलेट कोसळली नाही. बुलेट स्वारानं त्याच्या शैलीत बुलेट सावरली आणि पुढे गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एके काळी बुलेटचा आवाज आला की, दूधवाला आला अशीच या गाडीची ओळख होती. पण, आता या गाडीची तरुणांमध्ये क्रेझ आहे. स्वस्तातील फोरव्हीलरपेक्षा महाग असलेल्या या गाडीमुळे रुबाब वाढतो, असे तरुणाईचे ‘इंप्रेशन’ आहे. त्यामुळेच आता कॉलेजच्या पार्किंगमध्ये बुलेट दिसू लागली आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “जलवा आहे बुलेटचा” असं लिहलं आहे तर व्हिडीओवर “भावा बुलेट आहे ती एवढ्या सहजासहजी नाही पडणार” असं लिहलं आहे. बुलेटस्वाराचे नशीब बलवत्तर म्हणुन तो बचावला नाही तर मागून येणारी गाडीची धडक लागून तो बाईकस्वार गंभीर जखमी झाला असता किंवा त्याचा मृत्यू देखील होऊ शकलाा असता. वेळ आणि काळ कधी आणि कुठे कसा येईल याचा काही नेम नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आमचं सौभाग्य आहे…” राम मंदिराचं काम करणाऱ्या मजूरांनी व्यक्त केल्या भावना; VIDEO पाहून वाटले अभिमान

@kehnaa.kya.chahte.ho नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आला आहे. याशिवाय थोड्याच वेळात व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car driver hit the royal enfield bullet in anger the video of the incident went viral srk