सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यापैकी काही स्टंट असे देखील असतात जे पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. सध्या अशाच एका स्टंट व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामध्ये एका चालकाने आपली कार महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन वाहनांच्या मधून अशा प्रकारे बाहेर काढली की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

अवघ्या ८ सेकंदाची ही क्लिप पाहून या कार चालकाने असा पराक्रम कसा केला, असा प्रश्न लोकांना पडला आहे. हायवेवर अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात दुसरी कार भरधाव वेगाने रस्त्यावर येताना दिसते. पण पुढच्याच क्षणी असे काही घडते, जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाईल. कार चालक दोन वाहनांमधून वेगाने जातो आणि तेही दोन चाकांवर कार चालवत. हा व्हिडिओ खरच आश्चर्यचकित करणारा आहे. कारण, थोडीशी चूक दोन वाहनांमध्ये बसलेल्या लोकांना अडचणीत आणू शकली असती.

( हे ही वाचा: Video: लग्नमंडपात नवऱ्याची मेव्हणीकडे भलतीच मागणी, म्हणाला “मला ५ किस…”)

येथे आश्चर्यकारक स्टंट व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: Video: अरे कुणी तरी आवरा हिला! भरधाव वेगात आली अन् थेट तरुणाला धडकली, म्हणाली “तुला…”)

ट्विटरवर @ViciousVideos या हँडलवरून हा अप्रतिम स्टंट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ४७ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर शेकडो लोकांनी त्याला लाईक केले आहे. याशिवाय युजर्सही जोरदार शेअर करत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे, माझा यावर विश्वास बसत नाही. हा व्हिडिओ मी अनेकदा पाहिला आहे. तर दुसर्‍या युजरने लिहिले आहे, अरे भाऊ! कोण आहे हा जेम्स बाँड?

Story img Loader