Shameful Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही व्हिडीओ पाहून माणुसकी जिवंत आहे की नाही, असाच प्रश्न पडू लागतो. माणूस आपल्यातच इतका हरवून गेला आहे की, साधी माणुसकी आणि शिष्टाचार विसरत चालला आहे. आजकाल जरासे काय पैसे आले, माणूस थोडा श्रीमंत काय झाला की, स्वत:ला मालकच समजू लागतो. म्हणूनच पैशांचा माज असलेल्या माणसाला कधीच माणसाची किंमत कळू शकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असं म्हणतात कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. आपलं पोट भरण्यासाठी लाखो लोक पडेल ते काम करतात आणि आपला दिवस घालवतात. म्हणून प्रत्येक कामाचा आदर आणि माणसाचा आदर केला पाहिजे, अशी शिकवण आपल्याला दिली जाते. पण काही जण ही शिकवण विसरतात आणि दुसऱ्यांपेक्षा स्वत:ला जास्त प्राधान्य देतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरून त्यांच्याशी वागतात, बोलतात आणि त्यांचा अपमान करतात. सध्या असाच एक माणुसकीला काळिमा फासणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; जो पाहून तुमचाही राग अनावर होईल.

हेही वाचा… “आम्हाला माफ करा महाराज”, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून तरुणीचे अश्रू अनावर, चित्रपटगृहात ढसाढसा रडू लागली अन्…, पाहा VIDEO

u

कारचालकाने केला महिलेचा अपमान

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, पेट्रोल पंपावर काम करणारी एक महिला कर्मचारी एका कारमध्ये पेट्रोल भरताना दिसतेय. ती आपलं काम अगदी चोख करताना दिसतेय. कारमध्ये पेट्रोल भरून झाल्यावर ती पैसे घेण्यासाठी कारचालकाजवळ जाते, तेव्हा कारचालक व्यक्ती कारची काच खाली करते आणि पैसे तिच्या अंगावर फेकून, तिथून निघून जाते. मग ती महिला कर्मचारी फेकलेले ते पैसे जमिनीवरून एकेक करून जमा करते. आपल्याला दिलेली अशी वागणूक पाहून, तिचे अश्रू अनावर होतात आणि ती तिथेच रडू लागते.

हा व्हायरल व्हिडीओ @rott.weiler62 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला असं कोणाबरोबरही करू नका, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओला एक लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… रस्त्यात डिलिव्हरी बॉयची बंद पडली गाडी, पुढे अचानक पोलिसांनी अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “माहीत नाही लोक असे का करतात.” दुसऱ्यानं “दुनियेत कशी कशी लोक असतात”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “त्या माणसाला त्याच्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car driver throws money on woman employee at petrol pump insults her shameful video viral on social media dvr