Car Hits Bike Near Nagpur Airport Road Video Viral : नागपूरच्या विमानतळाजवळ असलेल्या एक रस्त्यावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भरधाव वेगानं जाणाऱ्या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. राकेश गाटे आणि आकाश टेकम अशी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावं आहेत. कारने धडक दिल्यानंतर दोघेही रस्त्यावर खाली पडले आणि जखमी झाले. मात्र, कार चालकाने कोणत्याही प्रकारची मदत न करता त्यांना रस्त्यावरच सोडून दुचाकी ३ किमीपर्यंत फरपटत नेली. या अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार चालकाविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, नागपूर पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कार चालक दुचाकीला धडक देऊन फरपटत नेत असताना आजूबाजूला असणाऱ्या प्रवाशांनी हे दृष्य कॅमेरात कैद केलं आणि व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल केला. विमातळाजवळ झालेल्या अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी पोलीस उपस्थित नव्हते, असं समजते आहे. रिपोर्टनुसार, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नक्की वाचा – Video: देशी जुगाड करून भन्नाट गाडी बनवली, हात पाय नसणाऱ्या माणसाची जिद्द पाहून सर्वच झाले थक्क

इथे पाहा अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ

राजीव नगरच्या प्राईड हॉटेलजवळ हा अपघात घडला. त्यानंतर कारचालकाने दुचाकीला ३ किमीपर्यंत फरपटत नेलं. दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरून प्रवास करणारे दोन व्यक्ती रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही. कारण कार चालकाने दुचाकीसह दोघांनाही फरपटत नेलं असतं, तर कदाचित त्यांचा मृत्यू झाला असता. कार भरधाव वेगाने जात होती आणि त्याचदरम्यान कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर असलेले दोन व्यक्ती रस्त्यावर पडले. पण त्यांना मदत करण्यासाठी कार चालक धावून आला नाही. त्याने कारच्या बोनेटला अडकलेल्या दुचाकीला फरपटत नेलं, अशी माहिती स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना दिली.