Funny car photo: ट्रकच्या मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्ये तुम्ही पाहिली असतील. देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे. भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका कारच्या मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर एका पांढऱ्या स्विफ्ट कारचा फोटो व्हायरल होत आहे, ज्याच्या मागे दोन संदेश लिहिलेले आहेत. पहिला संदेश वाचल्यानंतर तुम्हाला ‘धमाल’ चित्रपटातील असरानी आठवेल. पण दुसरा मेसेज वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.दुसऱ्या मेसेजमध्ये लिहिले आहे “कीप डिस्टन्स ईएमआय पेंडिंग” म्हणजेच कारचे हप्ते अद्याप बाकी आहेत, त्यामुळे अंतर ठेवा. आता ही कार सोशल मीडियावर लोकांमध्ये हसण्याचा विषय बनली आहे. मात्र, हा मेसेज पाहून गाडीचा मालक प्रामाणिक आहे हे नक्की आणि उघडपणे सांगतोय की भाऊ, माझी गाडी ईएमआयवर चालते.
अशा कोट्ससह कार ऑनलाइन व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर अशा फनी कोट्समुळे अनेक वाहने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत.अलीकडेच, बेंगळुरू आणि हैदराबादमधून दोन फोटो समोर आले आहेत ज्यात कॅब चालकांनी प्रवाशांसाठी विचित्र संदेश लिहिले होते आणि ते सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.
पाहा फोटो
सोशल मीडियावर @HasnaMatBhai नावाच्या एक्स खात्यावरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे, जी आतापर्यंत ३ लाख ८७ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. तर अनेकांनी या पोस्टला लाईकही केले आहे. अशा स्थितीत सोशल मीडिया यूजर्समध्ये या पोस्टबाबत विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…कारचा मालक प्रामाणिक आहे. दुसऱ्या युजरने लिहिले…भाऊ, कारचा विमा काढा, कोणतेही टेन्शन राहणार नाही.
© IE Online Media Services (P) Ltd