Funny car video: ट्रकच्या मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्ये तुम्ही पाहिली असतील. देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे. भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, मुंबईतल्या अशाच एका कारच्या मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आई-वडिलांचा कृपा, अण्णांची कृपा, पप्पांची कृपा, देवीची कृपा, देवाची कृपा, यांसारख्या ”टिंबटिंबची कृपा’वाल्यापाट्या रिक्षा-टॅक्सी-ट्रकच्या मागे हमखास दिसतातच! त्यातचही आपल्या व्यवसायाचं नाव देऊन त्याची कृपा मानण्यात धन्यता मानणारा अवलिया अजूनतरी पाहण्यात आलेला नाही. म्हणजे रिक्षावाल्यानं कधी आपल्या गाडीवर नाव रिक्षाची कृपा असं लिहल्याचं पाहिलंय का कधी तुम्ही? किंवा अगदी एका मंत्र्याच्या गाडीवर राजकारणाची कृपा पाहिलंय का कुठं? नाही ना? मात्र सध्या एका कारचा व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यामध्ये एका माणसानं आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राला क्रेडिट त्याच्या कारवर देत अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.
आपल्याला जे क्षेत्र यश मिळवून देतं, त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. मुंबईतल्या एका व्यावसायिकाने शेअर मार्केटमधून मिळालेलं यश आणि आर्थिक सुबत्तेनंतर कृतज्ञता म्हणून चक्क आपल्या कारच्या मागे ‘शेअर मार्केटची कृपा’ असं लिहलं आहे.
पाहा व्हिडीओ
अशा कोट्ससह कार ऑनलाइन व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर अशा फनी कोट्समुळे अनेक वाहने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत.अलीकडेच, बेंगळुरू आणि हैदराबादमधून दोन फोटो समोर आले आहेत ज्यात कॅब चालकांनी प्रवाशांसाठी विचित्र संदेश लिहिले होते आणि ते सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.