Delhi meerut expressway accident: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. देशभरात दररोज कुठे ना कुठे अपघात तर घडतच असतात. त्यापैकी काही अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालविताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवून देत आहे. कारचालकाच्या एका चुकीने माय-लेकांचे बळी गेले आहेत.
दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. असाच एक भीषण अपघात उत्तर प्रदेशातील दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर चुकीच्या बाजूने येणाऱ्या कारला स्कूटी धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, स्कूटरवर बसलेले आई-मुलगा असे दोघेही अक्षरश: हवेत फेकले गेले आणि त्या दोघांचा मृत्यू झाला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.
उत्तर प्रदेशातील दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे आई आणि मुलगा अशा दोघांचे बळी गेले आहेत. आई आणि मुलगा या दोन्ही मृत व्यक्ती दिल्लीत राहत होत्या. रविवारी हरिद्वारहून गंगास्नान करून दोघेही रात्री स्कूटरवरून दिल्लीला परतत होते. दरम्यान, गाझियाबाद जिल्ह्यात दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर चुकीच्या बाजूने येणाऱ्या कारला त्यांची स्कूटी धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, स्कूटरवर बसलेले हे दोघेही मायलेक हवेत फेकले जात दूरवर जाऊन पडले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, द्रुतगती मार्गावर वेगात गाड्या ये-जा करीत आहेत. याचदरम्यान एक कारचालक चुकीच्या दिशेने द्रुतगती मार्गावर एका बाजूने जाताना दिसतोय. तेवढ्यात समोरून एक दुचाकीस्वार येतो आणि समोरची कार न दिसल्याने, तसेच गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवू न शकल्यानं कारला धडकतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल, आजोबांचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल
अपघातानंतर ही माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. कारण- महिला आणि तिचा मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतरचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मृत मुलाचे वय सुमारे १४ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी कार जप्त करून कारचालकाला अटक केली आहे.