स्वतःची गाडी असावी असे स्वप्न प्रत्येकाचे असते. पण हे स्वप्न पुर्ण करणे काहीजणांना आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. मग कधीतरी रस्त्यावर एखादी चांगली गाडी दिसली की त्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाची आठवण होते आणि मनं तिथेच रेंगाळत राहते. असेच काहीसे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये होत आहे. यामध्ये एक तरुण रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीकडे पाहत असल्याचे दिसत आहे. हे जेव्हा त्या गाडीच्या मालकाला समजते, तेव्हा काय घडते पाहा.

गाडीच्या मालकाला हे दोन तरुण गाडीशी संबंधित काहीतरी बोलत आहेत, रोज गाडी पाहायला येत आहेत हे समजताच यो या तरुणांना याबाबत विचारतो. तेव्हा त्यातील एका तरुणाला गाडी खुप आवडली असल्याचे समजते. गाडीबरोबर एक व्हिडीओ काढण्यासाठी हे दोघ अनेक दिवस प्रयत्न करत असल्याचे समजताच, गाडीचा मालक त्यांना चावी देतो आणि व्हिडीओ काढण्याची परवानगी देतो. यावर या तरुणांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: ‘कच्चा बदाम’ ते ‘मेरा दिल ये पुकारे..’ २०२२ मध्ये ‘हे’ व्हिडीओ झाले सर्वाधिक Viral; यातील तुमचा आवडता व्हिडीओ कोणता?

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: वाळवंटात राहणारा उंट जेव्हा बर्फाळ प्रदेशात पहिल्यांदा जातो; मन जिंकणारी त्याची प्रतिक्रिया एकदा पाहाच

गाडीच्या मालकाने या तरुणाची गाड्यांवरचे प्रेम आणि त्यांची इच्छा ओळखून त्याला गाडीत बसण्याची परवानगी दिली. मदत करण्याच्या या भावनेने नेतकऱ्यांची मनं जिंकली असून, ‘गाडीचा मालक खऱ्या अर्थाने ‘मोठ्या मनाचा’ आहे’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या व्हिडीओला ३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader