Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुले चालत्या कारमधून रस्त्यावर कोणाच्या अंगावरही पाण्याचे फुगे फेकताना दिसत आहे. हा प्रकार पाहून कोणीही संताप व्यक्त करेन.
रस्त्यावर स्टंट करणारे तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कार दिसेल. या कारच्या सन रूफ मध्ये दोन तरुण उभे दिसत आहे आणि रस्त्यावर दिसणाऱ्या कोणाच्याही अंगावर पाण्याचे फुगे फेकताना दिसत आहे. रस्त्यावरील महिला आणि पुरुषांवर ते फुगे फेकताहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. काही लोकं हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करेन.
sneha singh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “१६ मार्च २०२४ दुपारी नवी दिल्लीतील वसंत कुंज येथे दोन मुले रस्त्यावरील महिला पुरुष असे कोणालाही सहज पाण्याचे फुगे मारून फेकताना दिसले. हे खरंच खूप धोकादायक आहे आणि यामुळे कोणीही जखमी होऊ शकतो.” या कॅप्शनमध्ये या युजरने दिल्ली पोलीस आणि दिल्ली ट्रॅफीक पोलिसांना टॅग केले आहे.
हेही वाचा : VIDEO : जेव्हा कुत्र्यासमोर रोबो डॉग आला तेव्हा… व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच आवश्यक अशी कारवाई करा” तर एका युजरने लिहिलेय, “दिल्ली ट्रॅफीक पोलीस या मुलांबरोबर नीट होळी खेळा” अनेक युजर्स दिल्ली पोलीस आणि दिल्ली ट्रॅफीक पोलिसांना टॅग करत यावर प्रतिक्रिया देण्यासाठी दबाव टाकत आहे.
येत्या २४ तारखेला होळी आहे आणि २५ तारखेला धुलीवंदन आहे. या दिवशी लोकं एकमेकांना रंग लावतात हल्ली तरुण मुले धुलीवंदनला रंगांच्या पाण्याचे फुगे एकमेकांना फेकून मारतात पण अनेकदा या फुग्यांमुळे व्यक्तीला गंभीर इजा होऊ शकते.