कधी चालकाची गाडी त्याच्याच अंगावर चढलेली पाहिली आहे का ? अशीच काहिशी विचित्र घटना चीनमध्ये घडली. यात महिला चालकाची गाडी तिच्याच अंगावर चढली. काही पाऊले दूर ही महिला फरफटत गेली पण या अपघातातून ती सुदैवाने वाचली.
चीनच्या रस्त्यावर हा थरारक प्रसंग घडला. ट्रॅफिक पोलिसांनी काही कारणासाठी एका महिलेची गाडी अडवली. या आलिशान गाडीत बसलेल्या महिलेला कदाचित हीच बाब खटकली त्यामुळे गाडीचे दार उघडून तिने पोलिसांशी हुज्जत घातली. ही वादावादी इथेच थांबली नाही ही महिला पोलिसांशी भांडत गाडीतून बाहेर आली. गाडीचा दरवाजा उघडा ठेवून ही महिला भांडत असताना अचानक तिची गाडी मागच्या दिशेने सरकू लागली. गाडीने इतका वेग धरला की नक्की काय होतेय हे या महिलेला कळलेच नाही. त्यामुळे गाडीच्या वेगामुळे सुरूवातीला ही महिला काही अंतर फरफटत गेली त्यानंतर तिचा तोल जाऊन ती खाली पडली. काही अंतर दूर जाऊन तिची आलिशान गाडी थांबली. यातून महिला सुदैवाने थोडक्यात बचावली.