सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही अनेक अपघाताचे व्हिडीओ देखील पाहिले असतील, जे अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. एखाद्या व्यक्तीच्या अंगावरून गाडी गेली तर त्याचा जीव वाचणं अशक्यच. पण तरी काही असे चमत्कारिक अपघात होतात, जे पाहिल्यावर स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ट्रकच्या पुढे तरुणी स्कूटीवर उभी आहे. यावेळी सिग्नल लागल्यामुळे सर्व वाहने रस्त्यावर उभी आहेत. दरम्यान सिग्नल सुटतो आणि ट्रकच्या पुढे असणाऱ्या तरुणीला ट्रक चालक चिरडतो. ती तरुणी तिच्या स्कूटीसबोतच ट्रकखाली जाते. ट्रक ड्रायव्हरला तरुणी पुढे असल्याचं दिसलं नाही की मुद्दाम केलं आहे याचा तपास सुरु आहे. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून कि काय ट्रकखाली येऊनही या तरुणीला काही होत नाही, हे व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. मात्र या या संपूर्ण प्रकारानंतर तरुणीला असा काही धक्का बसला की ती थेट रस्त्याच्या कडेला जाऊन बसते.

हे संपूर्ण प्रकरण बाजूने जाणाऱ्या गाडीच्या कॅमेरात कैद झालं. हा व्हिडीओ @ipostcrashes नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: टोल भरण्यावरून राडा! ओळखपत्र मागितल्यानं महिलेला भयंकर मारहाण, केस ओढत लाथा बुक्क्यांनी..

सोशल मीडियावर तुम्हाला असंख्य व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायलसा मिळतात. त्यामुळे इथे एकदा का एखादा व्यक्ती आला की त्याचा वेळ कसा जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. इथे कधी मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कधी एखाद्या थराराक क्षणांचे. सोशल मीडियावर तुम्ही अनेक अपघाताचे व्हिडीओ देखील पाहिले असेल. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ थक्क करणारा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car run over people sleeping on road car hit then miracle happens accident video viral on social media trending srk