Car Accident Shocking Video Viral : रस्त्यावरील भीषण अपघातात मृत्यू होणाऱ्या लोकांची दिवसेंदिवस वाढत आहे. देशात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी लोक अपघातात जीव गमावत आहेत. महामार्गावरून गाड्या चालवताना लोक वेग वाढवतात आणि ऐनवेळी वेगावर नियंत्रण मिळवणं कठीण होतं. अशा बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे मोठ्या अपघाताच्या घटना घडतात. हायवेवर धावणाऱ्या गाड्यांचा वेग अधिक असतो. अनेक लोक त्यांच्ये ड्रायव्हिंग स्किल्सचा वापर करून वेग वाढवत असतात. परंतु, अतिवेगानं धावणाऱ्या वाहनामुळे ते चालक जीव धोक्यात टाकतात आणि प्रसंगी त्यांचा मृत्यूही होतो. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २२० प्रति किमी वेगाने धावणाऱ्या कारने टोल नाक्याला जोरदार धडक दिल्याने कारच स्फोट होऊन चक्काचूर झाला.
अपघाताच्या व्हायरल झालेल्या थरारक व्हिडीओत पाहू शकता की, एका चालकाने हायवेवर कार २२० किमी वेगाने सुसाट चालवली. मात्र, काही अंतरावर असलेल्या टोक नाक्याचा त्या चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे कार टोल नाक्याला धडकली आणि कारचा जागीच स्फोट झाला. चालक कारच्या वेगावर नियंत्रण मिळवण्याआधीच कार टोल नाक्याला धडकते आणि त्या गाडीचा चक्काचूर होतो. हा भयानक अपघात घडल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांचा थरकाप उडतो.
नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत झाडे दिसतात ना? पण एक स्री सुद्धा लपलीय, एकदा क्लिक करून बघा
व्हिडीओ पाहून यूजर्सही झाले थक्क
या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला की नाही, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. पण असं जरून म्हणू शकतो की, अशा अपघातांमध्ये एखाद्या माणसाचा जीव वाचणं शक्य नसत. अपघाताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सलाही मोठा धक्का बसला आहे. एका यूजरने म्हटलंय, ड्रायव्हर वाचला नसेल. दुसरा यूजर म्हणाला, कारमध्ये असलेल्या चालकाची काय अवस्था झाली असेल, याचा अंदाज लावू शकत नाही. तर अन्य एक यूजर म्हणाला, ही तर आत्महत्या आहे.