Car Steering Wheel In Bike: जगभरात असे कित्येक लोक आहेत जे काही ना काही जुगाड करून स्वत:चे कौशल्य सिद्ध करत असतात. सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओवर व्हायरल होत असतात जे पाहून लोकांना स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. सध्या असाच एका जुगाडचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाड करून बाईकला चक्क स्टेअरिंग लावले. व्हिडीओ पाहूल लोक चक्रावले आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे तर दुसरीकडे व्यक्तीच्या जुगाडचे कौतूक करत आहे.
जुगाडू बाईक पाहून थक्क झाले लोक
व्हिडीओच्या सुरुवातीला सर्वात आधी एक बाईक दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला हँडलऐवजी कारचे स्टेअरिंग लावलेले आहे. एवढंच नाही तर हा व्यक्ती स्टेअरिंग लावलेले बाईक बिनधास्तपणे चालवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाल. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना प्रश्न पडला आहे, असा विचित्र जुगाड करायची गरज काय होती? सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Flirting मध्ये पुणेकरांचा नादखुळा! एफसी रोडवर तरुणाने तरुणीला दिली चिठ्ठी, लिहिले, “तू पेन्सिल आहेस का?….
हेही वाचा – कुत्र्याने मालकाला बनवले मालामाल! समुद्र किनारी सापडली कोट्यावधीची वस्तू, मच्छिमारचे बदलले नशीब
हे काही पहिली वेळ नाही जेव्हा असा विचित्र व्हिडीओ समोर आला असेल. याआधीही कित्येकदा अशा विचित्र जुगाडचे व्हिडीओ समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने ट्रॅक्टरच्या टायर बाईकला लावले होते.