तरुणांमध्ये बाइक आणि चारचाकी गाड्यांची क्रेझ आहे. मात्र असलं तरी काही तरुण धोकादायक स्टंट करताना दिसतात. यामुळे त्यांच्यासह इतरांचा जीवही ते धोक्यात टाकत असतात. एक छोटीशी चूक जीवावर बेतू शकते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण कारसोबत स्टंट करताना दिसत आहे. मात्र स्टंट करता अशी घटना घडली की नेटकऱ्यांना स्टंटबाज तरुणाला धारेवर धरलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर @Superautovip नावाच्या इन्स्टाग्राम अकॉउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत तरुणांचा स्टंट फेल झाल्याचं दिसत आहे. या व्यतिरिक्त गाडीचे दोन तुकडे झाल्याचं दिसत आहे. सुरुवातील स्टंट करताना तरुण गाडी स्टार्ट केल्याने वेगाने पुढे नेण्यासाठी एक्सलेटवर पाय देतो. गाडी वेगाने पुढे जाते. पण काही अंतरावरच गाडीचे दोन तुकडे होतात. यामुळे गाडीमधून धूर आणि जमिनीवरची धूळ वर उडताना दिसते.

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. सुदैवाने स्टंट करणाऱ्या युवकाला कोणतीही जखम झाली नाही. गाडीचे दोन तुकडे झाल्यानंतरही एक तुकड्यात तरुण आरामात बसल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

Story img Loader