Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक चिपळूणमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. झालं असं की आईच्या डोळ्यांसमोर मुलाच्या अंगावरून कार गेली. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.
आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मात्र विचार करा एका आईसमोर लेकरु कारखाीृली चिरडलं जातंय.. काय अवस्था झाली असेल तिची.
एका कारचालकाच्या चुकीमुळे एका आईचं लेकरू गाडीखाली आल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला एक आई आणि तीच लेकरू बसलं आहे. यावेळी तिथे एक कार रिव्हर्स घेत मागे येत असते. रिव्हर्स घेत असताना अचानक कार तिथे असलेल्या खांबाला आदळते आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या मुलाच्या अंगावरून जाते. हा धक्का इतका जोरदार असतो की यामुळे मागचा स्टँड देखील तुटून वेगळा होतो. आपल्या मुलाला गाडीने चिरडल्याचे हे दृश्य आई आपल्या उघड्या डोळ्यांनी बघते आणि दुसऱ्याच क्षणी त्याला वाचवायला पुढे धावते. सुदैवाने या घटनेत मुलाला फार दुखापत होत नाही आणि ती वाचतो. आपल्या मुलाला सुखरूप पाहून आईचा जीव हातात येतो आणि ती तात्काळ त्याला उचलत तेथून निघून जाते.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ganeshnishad1585 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत.