आजकाल अशा अनेक वेबसिरीज रिलीज होतायत ज्या ऑनलाईन चोरी, फसवणूक याविषयांवर आधारित आहेत. यात चोरीसाठी लोकं काय कल्पना लढवतात याची माहिती होते. आजवर आपण एटीएम मशीनमधून अत्यंत हुशारीने केलेल्या चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ पाहिले. पण आता एटीएम मशीनचं नाही तर दुकानांमधील पीओएस मशीनमध्येही हायटेक चोरीच्या घटना घडत आहेत. चोरीच्या या नव्या फंड्याने ग्राहकांचे बँक अकाउंट क्षणात रिकामी होत आहे. इंटरनेटवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एटीएम मशीनमध्ये चोरीसाठी वापरली जाणारी कल्पना दुकांनांमधील पीओएस मशीनसाठी वापरली जात आहे. त्यामुळे तुम्हीही दुकानांमध्ये कार्डने (scamming Card shimmer viral video) पैसे देत असाल, तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पाहा.
@fasc1nate या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यातील चोरीचा हायटेक फंडा पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या व्हिडीओमध्ये दिसतेय की, एक व्यक्ती दुकानातील पीओएस मशीनमधून ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते ते सांगतोय. पॉइंट ऑफ सेल मशीन किंवा POS ही अशी मशीन आजकाल अनेक दुकानांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्याद्वारे लोकांना त्यांचे डेबिट कार्ड स्वाइप करून पेमेंट करता येते. पण, याच पीओएस मशीनच्या किबोर्डवर आणखी एक किबोर्ड लावून चोरट्यांकडून ग्राहकांच्या अकाउंटची माहिती घेतली जात आहे.
मशीनवर आणखी एका किबोर्डचा वेगळा स्लॉट
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती दुकानात जातो आणि तेथे ठेवलेल्या पीओएस मशीनचा वरचा भाग सहज उचलून दाखवतो. यावेळी मशीनच्या किबोर्डवर बसवलेला किबोर्डचा वेगळा स्लॉट दिसून येतो. हा स्लॉट पूर्णपणे वेगळा होतो. मशीनवरील याच बनावट किबोर्डच्या माध्यमातून ग्राहकांच्या एटीएम कार्डचा पासवर्ड चोरला जात होता. तसेच कार्डची डुप्लिकेट कॉपी बनवण्यासाठी त्याचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारची चोरी एटीएम मशीनमधूनही अनेकदा उघड झाली आहे ज्यातून ग्राहकांच्या एटीएम कार्डची तपशीलवार माहिती घेतली जाते.
मुलीला भेटून घरी परतणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांवर काळाचा घाला; भरधाव कारने चिरडल्याचा Video व्हायरल
या हायटेक चोरीच्या व्हिडीओला २.४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी यावर कमेंट करत आपलं मत मांडल आहे. एका यूजरने या चोरीमागे दुकान मालकाचाही हात असेल अशी शंका कमेंटमधून व्यक्त केली आहे. तर आणखी एकाने म्हटले की, मशीनमध्ये अशी काही गोष्ट लावली आहे हे कॅशियरला देखील माहित होते.