लहान मुलांना शाळेत कसं वागवावं याबाबत अनेक संकेत तसंच नियम आहेत. पण, शिक्षकांकडून त्या नियमांचं सर्रास उल्लघन होतं. चिमुकली मुलं दररोज शाळेत जायची. शाळेत जाऊ लागल्यानंतर काही दिवसांनी मुलांमध्ये अचानक बदल जाणवू लागला. पालकांना आपल्या मुलांमधील बदल जाणवू लागला. मात्र नक्की कळत नव्हते की काय झालं. मुलं शाळेतून आल्यानंतर गप्प रहायची, मोकळं बोलत नव्हती. पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांची विचारपूस केली असता मुलांनी जे सांगितलं त्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पालकांनी थेट संस्था चालकांची भेट घेतली. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासत अखेर खळबळजनक गोष्ट समोर आली. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
हा व्हिडीओ बंगुरुळुमधला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, लहान मुलं एकत्र खेळण्यांसोबत खेळत आहेत. निळ्या रंगाची साडी नेसलेली महिला एका मुलाला घेऊन बाहेर जाते आणि दरवाज्याला बाहेरून कडी लावते. यानंतर बाकी मुलं रूमच्या आतमध्ये कुणाच्याही देखरेखीशिवाय खेळताना दिसत आहेत. तेव्हाच एक मुलगा दुसऱ्या मुलाला मारायला सुरूवात करतो. हे सगळं सुरू असताना ते थांबवायला तिकडे कुणीही केअर टेकर नव्हता. हा मुलगा सतत त्या मुलीला मारताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ‘मग बापालाच फोन करा की माझ्या’, चिमुकल्यानं थेट शिक्षिकेलाच दिली धमकी, Video पाहून पोट धरुन हसाल..
हा व्हिडीओ पाहताना त्यांचे पालकही शॉक झाले आहेत, एवढं सगळं सुरु असताना बराच वेळ कोणीही त्याठिकाणी उपस्थित नाही. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. तर या शाळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही पालक करत आहेत.