अंकिता देशकर
Cars Falling From Building Viral Video: फ्रान्समधील आंदोलनाचे हृदयद्रावक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.असाच एक व्हिडिओ लाईटहाऊस जर्नालिज्मला व्हायरल होत असल्याचे लक्षात आले, ज्यात एका इमारती वरून गाड्या खाली पडत असल्याचे दिसत आहे. नेमकं हे प्रकरण काय आणि या व्हिडिओचं सत्य काय हे आपण जाणून घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर @Sankeeth Naidu ने हा व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर यूजर्स देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही आमचा तपास सुरु करताना इन्व्हिड टूल मध्ये व्हायरल व्हिडिओ अपलोड केला आणि त्याचे किफ्रेम्स मिळवले. त्या किफ्रेम्स वर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून, ते व्हिडिओज शोधले. आम्हाला Mirror च्या वेबसाईट वर हि बातमी दिसून आली. या बातमीचे हेडिंग होते:फास्ट अँड फ्युरियस 8 क्रू चित्रपटातील नवीन व्हिज्युअल्स बहुमजली पार्किंगमधून गाड्या खाली घसरत आहेत
या आर्टिकल मध्ये म्हटले होते: क्रूने क्लीव्हलँड, ओहायोच्या रस्त्यावर एक विस्तृत स्टंट केल्यानंतर चाहते आता पुढे काय होणार ते पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
या व्हिडिओ मध्ये सांगितले गेले होते कि हा व्हिडिओ क्लीव्हलँड, ओहायोचा आहे. ८ जून २०१६ रोजी फेसबुक वापरकर्त्याने Magic Touch Miami ने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आम्हाला व्हायरल क्लिप देखील आढळली.
कॅप्शन मध्ये म्हंटले होते: Fast and Furious 8 crazy scene cars flying from a parking lot into the Street!!
Raw material by: FB- @kasey crabtree
INSTA- @kasey_crabtree
YT- Kasey Crabtree
आम्हाला हा व्हिडिओ roadandtrack.com वर देखील अपलोड केलेला मिळाला.
आम्हाला त्याच संदर्भात आणखी काही बातम्या आढळल्या.
हे ही वाचा << शिर्डी साईबाबा मंदिरातली देणगी कुठे जाते बघा म्हणत व्हायरल केला Video; ‘हिंदूंनो डोळे उघडा’ सांगणाऱ्या ट्वीटचं सत्य काय?
निष्कर्ष: क्लीव्हलँड, ओहायो येथे फास्ट अँड फ्युरियस चित्रपटाच्या स्टंटच्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो फ्रान्समधील आंदोलनाशी संबंधित असल्याचा असल्याचा दावा चुकीचा आहे.