काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी आणि देश भष्ट्राचार मुक्त बनवण्यासाठी मोदींनी देशापुढे कॅशलेस व्यवहाराचा पर्याय ठेवला आहे. हळूहळू देश कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वळू लागला आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे एका पित्याने आपल्या मुलीचे रिसेप्शन चक्क कॅशलेस केले आहे. मुलीच्या लग्न पत्रिकेच्या खाली त्यांनी तिचा बँक खाते क्रमांक दिला आहे. त्यामुळे लग्नाला येणा-या मंडळीने पैशांचा आहेर न आणता जी रक्कम आहे ती तिच्या बँक खात्यात जमा करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
..म्हणून माजी सैनिकाची लग्न पत्रिका होत आहे व्हायरल
मुळचे बुलंदशहर येथले रहिवाशी असणारे डीजी गुप्ता यांच्या मुलीचे १२ डिसेंबरला लग्न आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्न पत्रिकेखाली तिचा बँक खाते क्रमांक दिला आहे. लग्नाला येणा-या मंडळींना त्यांनी आहेर म्हणून पैशांचे पाकिट न आणण्याची विनंती केली आहे. त्याबदल्यात चेक किंवा तिच्या बँक खात्यात आहेराची रक्क जमा करण्याची त्यांनी विनंती केली आहे. इतकेच नाही तर आपल्या विनंतीला मान देऊन अनेकांनी तिच्या खात्यात आहेराची रक्कम जमा करायला सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदीचा निर्णय जाहिर केला. तसेच बँकेतून आणि एटीएम कार्डद्वारे रक्कम काढण्यावरही मर्यादा घातल्या त्यामुळे त्या लग्नाची तयारी करताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागला. नवरी मुलीच्या कपडे खरेदी पासून ते मंडप, हॉल असे सगळेच व्यवहार त्यांनी चेकद्वारे केले आहे.
VIRAL : नवरदेवाविना पार पडला ऑनलाइन विवाह सोहळा
डीजी गुप्ता यांची मुलगी खुशबू हिचा विवाह सोहळा १२ डिसेंबर गाझियाबाद येथे पार पडणार आहे. त्यामुळे लग्नाला येणा-या व-हाडी मंडळीना आहेर देताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी हि शक्कल लढवली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब मधील एका जोडप्याने रिसेप्शनच्यावेळी सोबत कार्ड स्वाईप मशीन ठेवले होते. त्यामुळे लग्नाला आलेली मंडळी या स्वाईप मशीनवर आहेराची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करत होते.