तू एकटीच कशी काय जग पालथं घालणार? लोक काय म्हणतील? तू कशी जगशील? तूझं काय बरं वाईट झालं तर? असे एक ना अनेक १०० प्रश्न तिलाही विचारले असतील पण या सगळ्याचा विचार तिने केला असता तर तिने जग पालथ घातलंच नसतं. भटकंतीचे वेड असलेल्या अनेकांना कॅसेंड्रा या अमेरिकन सोलो ट्रव्हलरविषयी माहिती असेलच. फक्त १८ महिने २६ दिवसांत तिने १९६ देशांची भटकंती केली आहे.
वाचा : राजस्थान भ्रमंतीच्या वेडापायी ‘या’ जपानी पर्यटकाने खरेदी केला उंट
वाचा : भटकंतीच्या वेडापायी १९३ देश घातले पालथे
कॅसेंड्रा दि पिकॉल या अमेरिकन तरुणीने कमी वेळात १९६ देशांची सफर केली आहे. सर्वात कमी वेळात या देशांची भ्रमंती करण्यासाठी तिला गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही मिळू शकतो. यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पडताळणी होत आहे. २०१५ मध्ये आपण जगाच्या सफारीला सुरूवात करणार असल्याचे तिने जाहिर केले. सुरूवातीला पाळणाघर चालवून तिला जे पैसे मिळाले त्यातून तिने आपल्या प्रवासाला सुरूवात केली. पण आता तिच्या सफारीसाठी तिला अनेक प्रायोजकही मिळत आहे. कॅसेंड्राने हल्लीच अंटार्क्टिकाची सफारीही पूर्ण केली. १९६ देशांची भ्रमंती केल्यानंतर अंटार्क्टिका भ्रमंती करण्याचे तिचे स्वप्न होते. तेही स्वप्न तिने पूर्ण केले.