Mumbai Police Shared Trending Memes : मुंबई पोलिसांची सायबर टीम सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. ही टीम ऑनलाइन गुन्हेगारीपासून सुरक्षित वाहतुकीसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या पोस्ट करीत असते. दरम्यान, मुंबई पोलीस लोकांना जागरूक करण्यासाठी मीम्स, व्हिडीओ आणि चित्रपटातील डायलॉग्जचा वापर करतात. त्याचे क्रिएटिव्ह स्टाईलमधील ट्वीट लोकांनाही खूप आवडतात. त्यांची अशीच एक क्रिएटिव्ह पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सध्या इन्स्टाग्रामवर ‘कॅज्युअल है’ हे मीम चांगलेच व्हायरल होत आहे. आता मुंबई पोलिसांनीही रस्ते वाहतूक सुरक्षा टिप्स शेअर करण्यासाठी या मीमचा वापर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई पोलिस आणि सीपी मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये तीन वेगवेगळ्या स्लाइड्स आहेत. तिन्ही स्लाइड्सद्वारे रस्ता सुरक्षा टिप्स देण्यात आल्या आहेत. पहिल्या स्लाइडमध्ये आई, बाबा व दोन मुली बाइकवर बसलेल्या दिसत आहेत. तर त्याच्या खाली हाफ विंडोमध्ये ट्रेंडिंग कॅज्युअल है मीम दिसत आहे. पुढील स्‍लाइडमध्‍ये एक व्यक्ती मोबाईल फोनकडे पाहत कार चालवताना दिसत आहेत. तिसर्‍या स्लाइडमध्ये कार १४० च्या वेगाने पळताना दाखवली आहे. पहिल्या स्लाइडप्रमाणेच उर्वरित दोन स्लाइड्सवरही लिहिले आहे की, सेफ्टीची ही पद्धत केवळ कॅज्युअलच नाही, तर धोकादायकही आहे.

धक्कादायक! मॅकडोनाल्ड कॉफी कपाच्या तळाशी आढळला मेलेला उंदीर; VIDEO व्हायरल

मुंबई पोलिसांची ही पोस्ट अनेक युजर्सना आकर्षित करीत आहे. पोलिसांच्या या स्टाईलवर एका युजरने लिहिलेय की, ही Gen Z ची स्टाईल आहे. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, मुंबई पोलिस नेहमीच मनोरंजक पोस्ट टाकतात. मात्र, काही युजर्सनी या पोस्टचाही खरपूस समाचार घेतला आहे. एका युजरने लिहिलेय की, कार थांबवल्यानंतर चावी काढणे हेदेखील कॅज्युअल आहे. आणखी एका युजरने या पोस्टच्या कॅप्शनचे कौतुक करीत लिहिलेय की, कॅज्युअलमधून कॅज्युअल्टीचा धोका खूपच गंभीर आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Casual se casualty ka risk kaafi serious hai mumbai police road safety awareness tips with viral casual hai meme style sjr