अनेकांना मांजर पाळायला आवडते पण मांजर कधी काय गोंधळ घालतील याचा काही नेम नाही. नुकतीच एका जोडप्याने अॅमेझॉनचे पार्सल परत करताना चुकून मांजरीलाही त्या बॉक्समध्ये पॅक केल्याची धक्कादायक घडना समोर आली. सहा दिवासांनी अॅमेझॉन कर्मचाऱ्यांना ही मांजर सापडली तेव्हा तिला तिच्या मालकिनीकडे सुखरूप पोहवण्यात आले. दरम्यान आणखी एका मांजरीची करामत चर्चेत आली आहे. एका मांजरीने आपल्या मालकिनीच्या घर पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. खेळता खेळता एका मांजरीने असे काही केले की ज्यामुळे घरात आग लागली आणि या आगीमध्ये तब्बल १४ हजार डॉलरचे (साधारण ११ लाख रुपयांचे) नुकसान केले. या मांजरीने स्वत:सह कित्येकजणांचा जीव धोक्यात घातला होता.
मांजरीने नक्की असे काय केले ज्यामुळे घरात आग लागली हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य व्यक्त केले. खेळता खेळता मांजरीने किचनमधील इंटक्शन कूकर चूकून ऑन केला होता ज्यामुळी ही आगा लागली होती. ही घटना चायनामधील असून या मांजरीचे नावा जिंगौडियाओ असे आहे.
हेही वाचा – “आता विसाव्याचे क्षण!”, ६० वर्षात पहिल्यांदाच सुट्टी घेऊन बर्फात खेळतेय महिला, लेकाने शेअर केला आईचा हृदयस्पर्शी Video
साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, ज्या मांजरीमुळे फ्लॅटमध्ये आग लागली आहे, या घरातील मुलगा आणि घराती मालकीन डांडन सुरक्षित आहेत. डांडनने तिच्या माजंरीबरोबर सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ शूट केला. वहिडीओ या बिल्ली के साथ सोशल मीडियावर एक लाइव्ह स्ट्रीम सेशन केले. त्यांचे व्हिडीओ ८ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आह.
मांजरीच्या मालिकीनेचे म्हणणे आहे की, ४ एप्रिलाल जेव्हा तिला फोन आला तेव्हा ती घराबाहेर गेली होती. तिला घरात आग लागण्याचे सांगण्यात आले. दक्षिण-पश्चिम चीनमधील सिचुआन प्रांतातील तिच्या फ्लॅटवर गेली. येथे आल्यानंतर त्याला कळले की, आग लागण्यामागे तिची पाळीव मांजर जबाबदार आहे. मांजर किचनमध्ये खेळत असताना चुकून तिचा पाय कुकरच्या टच पॅनलवर पडला, त्यामुळे ते चालू झाले, अशी माहिती समोर आली.
हेही वाचा – हद्दच झाली राव! पार्सल परत करण्याच्या नादात चुकून मांजरीलाच बॉक्समध्ये केले पॅक, ६ दिवस अन्न-पाण्याशिवाय….
अग्निशमन दलाला कॅबिनेटमध्ये लपलेली एक मांजर सापडली. तिला दुखापत झाली नसून तिच्या अंगावर राख दिसत होती. लाइव्ह स्ट्रीम दरम्यान डांडनने अग्निशमन कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या आणि त्यांना मांजरीला अग्नि सुरक्षा टिप्स शिकवण्यास सांगितले. ज्याच्या उत्तरात ती म्हणाला की, “ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा त्याला मांजरीला या गोष्टी शिकवायला सांगण्यात आले होते.”
‘अग्निशमन केंद्रात राहणाऱ्या एका कुत्र्याला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही, “असे त्यांनी गमतीने सांगितले. याला आपणही जबाबदार असल्याचे डंडन यांनी सांगितले. कारण त्यांनी कुकर प्लग इन केलल्या अवस्थेतच सोडला होता. त्याच वेळी, तिला भविष्यात आग लागणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. सोशल मीडियावर लोक या प्रकरणावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.