सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी बरेच व्हिडीओ मजेदार असतात, तर बरेच भयानक व्हिडीओ असतात. साप विषारी असल्याने मानवाला वास्तविक जीवनात सापांपासून अंतर राखावे लागते. सोशल मीडियावर सापाचे व्हिडीओ जास्त पहिले जातात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मांजर सापाची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, त्यादरम्यान सापही उलट उत्तर देताना दिसत आहे. साप पुढे आला की मांजर विचित्र पद्धतीने पाठीमागे उडी मारताना दिसते, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

साधारणपणे असे दिसून येते की मांजरी त्यांच्या शेजारच्या इतर प्राण्यांबद्दल खूप सावध असतात आणि त्यांना अनेक वेळा भयंकर प्राण्यांना सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत घराच्या पार्क परिसरात बाहेर आलेल्या सापाला पाहून मांजर चिडते आणि वेगाने हल्ला करताना दिसते. दरम्यान, सापही मांजरावर हल्ला करताना दिसला आहे.

(हे ही वाचा: IPL 2022: स्टेडियममध्ये मॅचदरम्यान जोडप्याने केलं ‘किस’! ट्विटरवर आला मीम्सचा पूर)

(हे ही वाचा: ‘या’ पक्ष्याने काही सेकंदात गिळला जिवंत ससा! Video Viral पाहून नेटीझन्स झाले हैराण)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, तर हजारो यूजर्सनी या व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

Story img Loader