सोशल मिडियावर प्राण्यासंबंधीत अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर शहारे येतात. त्याचप्रमाणे प्राण्यामधील लढाईचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर सर्रास पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ज्यामध्ये एक पाळीव मांजर घराच्या मागच्या अंगणात आलेल्या सापाशी लढताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मांजरी घराच्या अंगणात फिरताना दिसत आहेत. ज्यांच्यासमोर अचानक एक साप येतो. सापाला पाहून मांजर सावध होते. त्यानंतर साप मांजरावर हल्ला करण्यासाठी आपले तोंड उघडतो, तितक्यात मांजर सापावर वेगाने आपल्या पंजाने हल्ला करते आणि त्याला फेकून देते. यानंतर साप पुन्हा मांजरीकडे हल्ला करायला जातो. मांजर पुन्हा त्याच्यावर पंजाने हल्ला करत दूर फेकून देते. जे पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: धूलिवंदनाच्या दिवशीचा मुंबई लोकलमधील ‘हा’ Video का होतोय व्हायरल एकदा पाहाच)
हा व्हिडिओ सोशल मिडियावर @Artsandcultr नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकांनी यावर कमेंट करायला देखील सुरुवात केली आहे. काहीजण या मांजरीचं धाडस पाहून कौतुक करत आहेत.