सोशल मीडियावर आश्चर्यचकीत करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात प्राण्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून सर्वाधिक पसंती मिळते. प्राण्यांच्या कृती पाहून नेटकऱ्यांना आनंद मिळतो. काही दिवसांपूर्वी एक कुत्रा कोंबड्यासारखा आरवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता असाच एका मांजरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मांजर चक्क कुत्र्यासारखी भुंकताना या व्हिडीओत दिसत आहे. सुरुवातीला मालकाला कळलं नाही की, कुत्रा भुंकत आहे की मांजर. जवळ गेल्यानंतर मांजरच असं करत असल्याचं लक्षात आलं.
व्हायरल व्हिडीओत मांजर कुत्र्यांना घाबरवण्यासाठी त्यांच्यासारखी कृती करताना दिसत आहे. मालकाने आपल्या कॅमेऱ्यानं व्हिडीओ चित्रित केला आहे. मांजर घरच्या खिडकीतून बाहेर डोकावत असल्याचं दिसत आहे. बाहेरच्या बाजूला कुत्र्यांवर त्यांच्या आवाजात भुंकताना दिसत आहे. मालकाला सुरुवातीला कळत नव्हतं नेमकं काय चाललं आहे. मात्र जवळ गेल्यानंतर मांजर अशी कृती करत असल्याचं लक्षात आलं.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरता येत नाही. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहेत. आतापर्यंत लाखों लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच त्याखाली मजेशीर कमेंट्स देत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, ही मांजर चांगली मिमिक्री आर्टिस्ट आहे. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, मांजर काही दिवसांनी माणसासारखं बोलेल.