Cat Nagin Dance Viral Video: पाळीव प्राण्यांसंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हृदयाला भुरळ घालतात. तर काही व्हिडिओमध्ये पाळीव प्राण्यांचा अभिनय पाहण्यासारखा असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मांजर नागीण धुनवर दोन्ही हात वर करून डोलताना दिसत आहे. तिला पाहिल्यावर एक नागीण डान्स करतेय असा भास होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे ही मांजर नागीण धुन वाजताच हातवारे करत डान्स करत आहे. धुन वाजताच ती आपले हात वर करते आणि नागिणीसारखी डुलायला लागते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही एक मिनिटासाठी आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

( ही ही वाचा: Video: दारूच्या नशेत चौघींनी मिळून एकीला बेदम मारले; भररस्त्यातच सुरू केला लाथेचा आणि बेल्टचा मार)

येथे व्हिडिओ पाहा

( ही ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर बॅड गर्ल्स नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत २ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेणारी ही मांजराची मांजर खरोखरच अप्रतिम आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर कमेंट करत आहेत. काहींनी याचे वर्णन सर्वात मोहक नाग नृत्य असे केले आहे. एका यूजरने ‘मांजरीच्या रुपात नागीण असं लिहिलं आहे’ असे लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cat dancing on nagin tune video goes viral on social media gps