सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांच्या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच सोशल मीडियावर मांजरांचे व्हायरल व्हिडीओ आपण अनेकदा पाहतो. कधी मांजरं एकमेकींशी खेळताना, तर कधी भांडताना दिसतात. मांजरांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना पाहायला खूप आवडतात. सध्या मांजरीचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो नेटकऱ्यांना आवडला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
पाळीव प्राण्यांवर आपण जेवढं प्रेम करतो, त्यापेक्षा अधिक प्रेम ते आपल्याला देत असतात. अनेक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. असाच एक व्हायरल व्हिडीओ लोकांना भावला आहे; ज्यामध्ये रेल्वे रुळाजवळ एक मांजर बाळांना जन्म दिल्यानंतर बेशुद्ध पडतं. त्यानंतर एक व्यक्ती मांजर आणि तिच्या बाळांना घेऊन जाते आणि त्यांच्यावर उपचार करून, त्यांना दूध पाजते. लोकांना हा करुणामयी व्हिडीओ खूप आवडला आहे. त्या व्यक्तीचं हे वात्सल्य पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आधी एक माणूस रेल्वे ट्रॅकजवळ पडलेली मांजर आणि तिची नवजात पिल्ले यांच्याकडे येते. तो पाहतो की, मांजर पिल्लांना जन्म दिल्यानंतर जवळजवळ बेशुद्ध पडली आहे आणि तिची चार पिल्ले तिच्यासोबत पडली आहेत. ही व्यक्ती एक-एक करून मुलांना स्वच्छ करून पिंजऱ्यात ठेवते. शेवटी दमलेल्या मांजरीलाही त्यात ठेवून निघून जाते. त्यानंतर मांजर आणि तिच्या पिल्लांची वैद्यकीय तपासणी केली जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
(हे ही वाचा : पर्यटकांच्या भरगच्च बोटीचे समुद्राच्या मध्यभागी अचानक दोन तुकडे; ‘हा’ Video पाहून भरेल धडकी; पण…)
व्हिडीओमध्ये मांजर पिंजऱ्यात अन्न खाताना आणि मुलांना दूध पाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ उझबेकिस्तानच्या तुलकुनोवमी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याला दोन लाख लोकांनी लाइक केले असून, ३३ हजार लोकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांची मने जिंकून घेत आहे.
येथे पाहा व्हिडिओ
हे अकाउंट तुर्कोनोव मिरजलील नावाच्या व्यक्तीचे असून, त्याच्या अकाउंटमध्ये असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे स्पष्ट आहे की, त्याला मांजरांची खूप आवड आहे. कमेंटमध्ये लोकांनी मिरजलीलचे खूप कौतुक केले आहे आणि देवाचे आभारही मानले आहेत. एका युजरने लिहिले, “मांजर मरणार होती; पण तिला आपल्या मुलांसाठी जगायचे होते आणि देवाने तिला वाचवले.” अशाप्रकारच्या अनेक नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.