आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाचे चार सामने खेळून झाले असून कोलकाता आणि लखनऊ हे दोन संघ प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. गुणतालिकेत राजस्थानचा संघ तीन विजय आणि चांगल्या गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांना अजूनही लय सापडता दिसत नाही. असं असताना सोशल मीडियावर आयपीएलमधील रोजच्या घडामोडींच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. असं असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. या व्हिडीओत एका मांजरीचं क्षेत्ररक्षण पाहून सर्वच आवक झाले आहेत. आयपीएस अधिकारी दिपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडीओत एक मांजर एका कोपऱ्यात छोट्या बॉलसोबत खेळताना दिसत आहे. तितक्यात तिचं लक्ष नसताना एक जण वर टेडीबेअर फेकतो. पण मांजर क्षणाचाही विलंब न करता हवेत झेप घेत टेडीबेअर हवेतच अडवते. ही झेप इतकी जबरदस्त होती की नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयपीएस अधिकारी दिपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला टॅग केलं आहे. त्याचबरोबर हॅशटॅग आयपीएल स्पिरिट असं लिहिलं आहे.

दीपांशु काबरा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक करत त्याखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Story img Loader