Cat saved Child: मानवांना धोके कळण्यापूर्वीच प्राण्यांना ते कळतात असं म्हणतात. अशा परिस्थितीत, ते त्यांच्या मालकाला कोणत्यातरी कृतीतून आधीच इशारा देण्याचा प्रयत्न करतात नाहीतर ते स्वतःच धोक्याचा सामना करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मांजरीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

मांजरीने केलं मुलाचं रक्षण (Cat Video Viral)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक पाळीव मांजर एका लहान मुलाला एका उंच इमारतीच्या बाल्कनीतून बाहेर डोकावण्यापासून रोखत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक पाळीव मांजर एका लहान मुलाला एका उंच इमारतीच्या बाल्कनीतून बाहेर डोकावण्यापासून रोखत असल्याचे दिसून आले आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, लहान मूल बाल्कनीच्या रेलिंगमधून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ते लहान मूल हात पुढे करताना आणि रेलिंग पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. तसंच यादरम्यान, मांजर तिथे बसून मुलाला हे करताना पाहत असल्याचे दिसत आहे. ती थोडा वेळ त्याच्याकडे पाहतंच असते. मग इकडे तिकडे पाहिल्यानंतर ती मुलाजवळ जाते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मुलाला थांबवण्यासाठी ती स्वतः बाल्कनीच्या रेलिंगवर चढते. मांजरीने वारंवार तिला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाळ शेवटी आत परत जाऊ लागते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @animalheroesworld या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “असे क्षण तुम्हाला विचार करायला लावतात… प्राण्यांना खरोखर किती समजते.” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ४.९ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मांजर हुशार आहे पण पालकांनी त्यांच्या मुलांना बाल्कनीजवळ राहू देऊ नये.” तर दुसऱ्याने “अशा पालकांची लाज वाटते” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी मांजरींचे जीवन धोक्यात घालत आहात. स्वतःच्या मुलाचे रक्षण करा आणि खरे पालक बना.” तर एकाने “मांजर फक्त आळशी नसते तर हुशार देखील असते.” अशी कमेंट केली.