सोशल मीडियावर रोज कोणते न कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात फक्त एखाद्या व्यक्तीचे नाही तर अगदी प्राण्यांचे व्हिडिओ देखील धुमाकूळ घालत असतात. असाच एक मांजरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये मांजर त्यांना आलेल्या नवीन खेळण्याचा तपास करताना दिसत आहे. पण हा तपास चांगलाच फसल्याचं दिसून येत आहे. घरात मांजर पाळलेल्या प्राणी पालकांना चांगलंच माहीत आहे कि मांजर हा जिज्ञासू प्रकारचा प्राणी आहे. त्यांना नेहमीच नवीन गोष्टींविषयी कुतूहल वाटत असते. त्या शक्यतो घरातली कोणतीही नवीन गोष्ट तपासल्याशिवाय राहत नाहीत. रेड्डीट या सोशल वेबसाईटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये सुद्धा हे दिसून येत आहे.
नक्की काय आहे त्या व्हिडीओमध्ये?
रेड्डीट या वेबसाईटवर अनेक लोक पोस्ट करत असतात. अशाच एका युजरने त्याच्या मांजरीचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी आणलेल्या नवीन खेळण्याला २ मांजरी तपासताना दिसत आहेत. तर तिसरी मांजर लांबूनच या तपासाकडे बघत आहे. त्या २ मांजरीपैकी १ मांजर काही वेळातच त्या खेळण्याकडे दुर्लक्ष करते. पण दुसरी मांजर अजून योग्यप्रकारे खेळण्याचा तपास करायला जाते आणि खेळण्यातच हात अडकल्यामुळे स्वतःच घाबरते. यामुळे खोलीत असलेल्या बाकीच्या मांजरीसुद्धा घाबरून जातात.
New toy investigation goes sideways
byu/TinyKittyofDOOM inStartledCats
व्हिडीओवर होतोय कमेंट्सचा पाऊस
१ दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडीओला १२ हजारांहून जास्त लोकांनी बघितलं आहे तर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने या मांजरींची नावं विचारली आहेत. त्यावर ज्यांच्या या मांजरी आहेत ते उत्तर देतात कि, ‘जास्त पांढऱ्या रंगाच्या मांजरीच नाव थॉथ आहे. जी या खेळण्याला जास्त तपासात आहे तिचं नाव एरिस आहे. तर जी लांबूनच या तपासाकडे बघत आहे तिचं नाव सिल्वाना आहे’. अजून एक युजर यावर कमेंट करतो कि, ‘मला हे तपास करणारे डोळे खूप आवडले! एरिस ही जिज्ञासू आणि एकदम हुशार लेडी दिसत आहे. तर बर्याच नेटिझन्सनी त्यांच्या स्वतःच्या माजारींचे किस्से सुद्धा कमेंट्समधून सांगितले आहेत.