प्राण्यांचे तसे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी जंगली प्राण्यांची खतरनाक शिकार पाहायला मिळते. तर कधी पाळीव प्राण्यांचं प्रेम. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून नेटकऱ्यांचे मनोरंजन होत असते. पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील पण चक्क झोका घेणारं मांजर पाहिलंय का.मांजरीच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, सोशल मीडियावरही हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मांजर बांधलेल्या दोरीवर झोका खेळत आहे. पुढच्या दोन पायांनी दोरी पकडून ही मांजर अगदी आरामात झोका खेळत आहे. तिचा हटके अंदाज तुम्हालाही आश्चर्यचकित करेल. मांजरीचा हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधत असून व्हिडीओवर भरपूर प्रतिक्रिया येताना दिसत आहे. पाळीव प्राणी असणाऱ्या घरांमध्ये रोज मजेशीर किस्से घडत असतात. मांजर नेहमीच घरात खोडसाळपणा करते. असाच काहीसा प्रकार व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बघायला मिळतो आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: एकटा तरुण ३ वाघांच्या तावडीत, तरुणाची अवस्था पाहून व्हाल अवाक्

लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जवळपास सर्वांनाच प्राणी आवडतात. विशेष म्हणजे कुत्री, मांजर हे पाळले देखील जातात, इतकेच नव्हेतर काही लोक घोडे, माकड आणि हत्ती देखील पाळतात. मात्र, भारतामध्ये मांजर पाळणे शुभ मानले जात नाही. परदेशामध्ये बरेच लोक मांजर पाळतात.