कल्पना करा एक कुटुंब आपल्या लाडक्या मांजराला घेऊन घरापासून दूर फिरायला गेले आणि तिथे त्या मांजराची आणि कुटुंबाची ताटातूट झाली. घरापासून दूर अनोळख्या ठिकाणी असलेले मांजर घरी कसे परतणार? पण, अखेर एक दिवस ते मांजर त्याच्या कुटुंबाच्या घरी पोहचते. कसे ते कोणालाही माहित नाही. हरवलेलं मांजर पाहून कुटुंबातील कोणालाही विश्वास बसत नाही. तुम्हाला वाटलं असेल की,ही एखाद्या चित्रपटाची कथा आहे पण नाही ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. कॅलिफोर्नियातील एका कुटुबांबरोबर खऱ्या आयुष्यात ही घटना घडली आहे.

जंगलात हरवलं मांजर

कॅलिफॉर्नियमध्ये राहणारे बेनी आणि सुझॅन अँगुआनो आपल्या लाडक्या मांजरांना घेऊन यलोस्टोन नॅशनल पार्कच्या जंगलात जूनमध्ये कॅम्पिंग ट्रिपला गेले होते. त्यावेळी त्यांचे लाडके मांजर काहीतरी पाहून घाबरले आणि जंगलातील झाडींमध्ये जाऊन लपले. दोघांनी फिशिंग ब्रिज आर.व्ही. येथे त्यांच्या कॅम्प ग्राउंडजवळील जंगलात पाच दिवस आपल्या मांजराचा शोध घेतला पण तेव्हा ते त्यांना सापडले नाही. बेनी आणि सुझॅनला वाटत होते की,”आता ते आपल्या लाडक्या मांजराला पुन्हा कधीच भेटू शकणार नाही.”

uran Kandalvan forest latest news in marathi
कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!
cat rescued By Young Boy
VIDEO: खिडकीवर अडकलेल्या मांजराला ‘त्याने’ असे वाचवले; मांजरीचे थरथरणारे पाय पाहून नेटकरीही भावूक झाले
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
loksatta readers response marathi news
लोकमानस : वृक्ष, रस्ते, कचरा सारे काही गायब

सयामीज प्रजातीच्या या मांजराचे नाव रेन ब्यू असे आहे. त्याचे वय फक्त २ वर्ष आहे. रेन ब्यू आणि त्याची बहीण स्टार जेव्हा ११ आठवड्यांचे होते तेव्हा ते बेन आणि सुझॅन जोडपे यांना भेटले. तेव्हा या जोडप्याने त्यांचे पालनपोषण करण्याचा आणि नंतर त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. “स्टार ही मांजर खेळकर होती पण तिच्या तुलनेत रेन ब्यू मात्र सुरुवातीला भित्रा वाटत होता, त्याने पटकन आपल्या नवीन घरातील वातावरणाबरोबर जुळवून घेतले.” असे सुझॅन यांनी सांगितले.

हेही वाचा – “याला म्हणतात मेड इन चायना!” कुत्र्यांनाच काळा-पांढरा रंग देऊन बनवले पांडा; शेवटी सत्य झालं उघड, पाहा Viral Video

८०० मैलांचा प्रवास करून मांजर परतलं घरी

सुझॅन यांनी सांगितले की, “यलोस्टोन नॅशनल पार्कच्या जंगलातील ट्रिपमध्ये रेन ब्यूची बहीण स्टार देखील त्यांच्याबरोबर होती. जेव्हा रेन ब्यू मांजर जंगलात हरवले तेव्हा स्टार अस्वस्थ झालं होतं. खूप शोध घेतल्यानंतरही मांजर सापडले नाही तेव्हा अखेरीस हृदयावर दगड ठेवून बेन आणि सुझॅन यांनी सॅलिनास येथे कॅलिफोर्नियाच्या घरी परत जाण्याचा कठोर निर्णय घेतला. आपल्या लाडक्या मांजराला सोडून जावे लागेल याची कल्पनाही बेन आणि सुझॅन यांनी कधीही केली नव्हती. सुझॅन म्हणाली की, “मी रेन ब्यूला सोडून जात आहे असे मला वाटत होते.” स्टार(मांजर) कधीही रेन ब्यूपासून दूर राहिली नव्हती. घरी परत येताना संपूर्ण रस्ता रेनब्यूसाठी स्टार व्याकूळ झाली होते.

सर्व प्रकरणाने वळण तेव्हा घेतले जेव्हा यलोस्टोनच्या जंगलामध्ये हरवलेले मांजर कॅलिफोर्नियामध्ये परत आलं. जवळजवळ दोन महिन्यांनंतर कॅलिफोर्नियातील रोझव्हिलेच्या रस्त्यावर रेन ब्यूच्या भटकताना दिसलं. KSBW या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार,” रोझव्हिले हे बेनी आणि सुझॅन राहतात त्या ठिकाणापासून उत्तरेकडे तीन तास दूर होते तर यलोस्टोन नॅशनल पार्कपासून जवळपास ८०० मैल म्हणजेच १२८८ किलोमीटरपेक्षा दूर होते.”

हेही वाचा – “बाईsss….हा काय प्रकार?” दारुच्या नशेत व्यक्तीने थेट सापाबरोबर घेतला पंगा, पुढे काय घडले ते Viral Videoमध्ये पाहा

अशी झाली आपल्या कुटंबासह मांजराबरोबर पुन्हा भेट

रेन ब्यूला वाचवणाऱ्या एका महिलेने तिला पाळीव प्राण्यांची काळजी घेणार्‍या स्थानिक सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स या संस्थेच्या रोझव्हिले येथील शाखेकडे या मांजराला सोपवले. रेन ब्यूच्या शरीरात असलेल्या मायक्रोचिपच्या मदतीने या संस्थेने बेन आणि सुझॅनबद्दल माहिती मिळवली.

हे सर्व प्रकरण बेन आणि सुझॅन यांना तेव्हा समजले जेव्हा संस्थेच्या एका कर्मचाऱ्याने रेन ब्यू सापडल्याचे त्यांना कळवले. आपले लाडके मांजर कॅलफॉर्नियामध्ये परत आले आहे यावर त्यांचा विश्वासच बसला नाही, ही बातमी ऐकून खरं तर बेन आणि सुझॅन यांना धक्काच बसला होता.

जेव्हा हे जोडपे जेव्हा आपल्या मांजराला पुन्हा भेटले, तेव्हा त्यांनी सांगितले की, रेन ब्यूने त्याच्या शरीराचे वजन ४० टक्के कमी झाले होते. तो प्रथम अस्वस्थ होता, परंतु जेव्हा त्यांनी त्याला कारमध्ये सोडले तेव्हा तो शांत झाला तो खूप थकला होता.त्याने फक्त माझ्याकडे पाहिले, आणि मग त्याने आपले डोके खाली केले आणि फक्त झोपी गेला.”

आपल्या लाडक्या मांजरापासून दूर असलेल्या बेन आणि सुझॅन हा दोन महिन्यांचा काळ अत्यंत अवघड होता. रेन ब्युची चिंता त्यांना राहून राहून सतावत होती. रेन ब्यूने यलोस्टोन ते रोझव्हिले असा ८०० मैल म्हणजेच १२८८ किलोमीटरचा प्रवास नेमका कसा केला हे मात्र एक गूढचं आहे.

जोडप्याने सांगितले की, “रेने ब्यू ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून घरी परतलं आहे आणि आता त्याची प्रकृती चांगली आहे. सुझॅन अँगुआनो तिच्या मांजरांबरोबर पुन्हा प्रवास करण्यास संकोच करत आहे, परंतु जर पुन्हा प्रवास केला तर घरापासून इतके दूर जाणार नाही नाहीत.”

KSBWला दिलेल्या मुलाखतीत इतर पाळीव प्राणी पालकांना आवाहन करताना हे जोडपे म्हणाले, “आपले पाळीव प्राण्यांना हरवू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकर वापरावे.”

Story img Loader