पोटभर जेवायला कोणाला आवडत नाही. अनेकदा असे घडते की भूक लागल्याने किंवा चांगले जेवण पाहून अनेकजण जास्तच खातात. आपण पोटाच्या भुकेपेक्षा जास्त अन्न खातो, पण त्यानंतर स्थिती निश्चितच बिघडते. अशाच अवस्थेत असलेल्या एका मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मांजर जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर जमिनीवर पडलेली दिसत आहे. एवढं अन्न पचवता येत नाही आणि आळशीपणामुळे मांजर तिथेच पडून आहे हे बघून.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मजेशीर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मांजर झोपलेले आहे आणि मांजरीसाठी ठेवलेल्या ट्रेमध्ये काही अन्न दिसत आहे. मांजर पाहून असे वाटते की तिने भुकेपेक्षा थोडे अधिक खाल्ले आहे आणि आता आळशीपणे विश्रांतीसाठी ती तिथे पडून राहते. व्हिडीओतील मांजरीची अवस्था पाहून तुम्हाला हसू येईल. खरंच मांजर बघून असं वाटतं की जास्त खाल्ल्याने तुमची अवस्था वाईट होऊ शकते. लोकांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे. विशेषत: मांजरप्रेमी हा व्हिडीओ प्रचंड शेअर करत आहेत.

(हे ही वाचा:शिकारीसाठी विषारी साप घुसला घरट्यात, पक्ष्यांच्या जोडीनेही दिलं चोख प्रत्युत्तर; बघा Viral Video)

(हे ही वाचा: हजारो फूट उंचीवर बंद पडले हेलिकॉप्टर, इंजिन सुरू करण्यासाठी पायलटने हवेतच बाहेर येऊन…;बघा Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा गोंडस आणि मजेदार व्हिडीओ इंस्टाग्रामवर catvibesonline पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर पन्नास हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइकही केले आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करून आपल्या मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cat rest after over eating food funny viral video ttg