बहुतेकांना घरात मांजर पाळणं खूप आवडतं. या गोंडस मांजरीचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज शेअर होत असतात. घरातल्या एका सदस्याप्रमाणेच लोक आपल्या मांजरीला सांभाळतात. मांजरांची निरागसता लोकांना फार आवडते. मांजरीचे असे क्यूट व्हिडीओ लोक वारंवार पाहत असतात. अशाच एका मस्तीखोर मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हि़डीओमध्ये मांजर चक्क वॉशिंग मशीनमध्ये घुसली. वॉशिंग मशीनमध्ये ती गोल गोल फिरू लागली. मांजराचा हा खेळ सध्या लोकांना खूपच आवडू लागलाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तपकिरी रंगाची मांजर वॉशिंग मशीनच्या आत फिरताना दिसत आहे. दुसरीकडे दुसरी काळी मांजर वॉशिंग मशिनजवळ उभी आहे आणि ती आत मजा करत असलेल्या मांजरीला पाहत आहे. बरं, आता फक्त ही मांजर सांगू शकते की ती वॉशिंग मशीनमध्ये का घुसली होती. पण व्हिडीओ पाहण्यासाठी खरोखरच खूप मजेदार आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाइक केलं आहे. अनेक लोक व्हिडीओ शेअरही करत आहेत.

आणखी वाचा : इवल्याश्या कासवांनी या VIRAL VIDEO तून दिला आयुष्यातला सर्वात मोठा धडा

तुम्हालाही हा व्हिडीओ पाहायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

आणखी वाचा : ब्लडप्रेशरच्या मशीनने शुगर तपासलं, ‘साथ निभाना साथिया’ मालिकेचा हा सीन होतोय VIRAL, मीम्सचा पाऊस

हा मजेदार व्हिडीओ cutecatsfanatic नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओ लाईक केलं आहे. cutecatsfanatic हे इन्स्टाग्राम अकाउंट पूर्ण तपासून पाहिलं तर यावर केवळ कॅट लव्हर्ससाठी मांजरी वेगवेगळ्या व्हिडीओंजा जणू खजिनाच आहे. या व्हि़डीओंमध्ये मांजरींचा खेळ पाहून मन अगदी प्रफुल्लीत होऊन जातं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत.

Story img Loader