प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काहीव्हिडीओ प्राण्यांचे रौद्र रूप दाखवून धक्क करणारे असतात, तर काही त्यांच्या गोंडस हावभावावर हसू आणणारे असतात. असाच एका मांजरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये मांजर टीव्हीवर चित्रपट पाहताना दिसत आहे. पण जेव्हा अचानक स्क्रीनवर सिंह दिसतो तेव्हा या मांजरीची काय अवस्था होते पाहा.
जंगलाच्या राजाला म्हणजेच सिंहाला सगळेच प्राणी घाबरतात, मग लहानशी मांजर याला अपवाद कशी ठरेल? व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये याचाच प्रत्येय येत आहे. या व्हिडीओमध्ये मांजर टीव्हीवर अगदी जवळून प्राण्यांचा चित्रपट पाहत असल्याचे दिसत आहे. सिंहीण आणि इतर प्राणी दिसत असताना मांजर आश्चर्याने ते पाहत असते. पण सिंह दिसताच मांजरीचा थरकाप उडतो आणि ती टेबलवरुन खाली पडते. पाहा मांजरीच्या गोंडस हावभाव दाखवणारा व्हिडीओ.
Viral Video : ‘पाण्यात पाय टाकायचा नाही’ असे सांगताच या कुत्र्यांनी पुढे काय केले एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ :
या व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.