न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, युनायटेड स्टेट्समधील उटाह येथील एका जोडप्याने चुकून त्यांची पाळीव मांजर ॲमेझॉन रिटर्न पॅकेजमध्ये पॅक करून पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांजर जवळ जवळ जवळजवळ सहा दिवस अन्न किंवा पाण्याशिवाय बॉक्समध्ये जिंवत होती.
मांजरीचे मालक, कॅरी क्लार्क यांना १० एप्रिल रोजी पाळीव मांजर गायब झाल्याचे आढळले. सुश्री क्लार्कने कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने त्यांचे घर आणि परिसर शोधण्यात जवळजवळ एक आठवडा घालवला. त्यांनी शहरभर हरवलेली पोस्टर्सही लावले. कॅलिफोर्नियातील ॲमेझॉन वेअरहाऊसमधील एका कर्मचाऱ्याने १७ एप्रिल रोजी गॅलेना नावाच्या मांजरीला पॅकेजमध्ये सुरक्षितपणे सापडल्याचे कळवले. मांजर जिवंत असल्याचे कळल्यावर कॅरी म्हणाली, “मला सुरुवातीला विश्वास बसला नाही आणि
![cat-shipped-in-amazon-return-package-travels-from-utah-to-california-in-6-days-survives-without-food-water-snk-94](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/04/image_c2dca9.png)
“गॅलेना (मांजर) माझ्यासाठी खूप मोठा भावनिक आधार आहे आणि गेल्या सहा वर्षांत तिने मला अनेक आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यास मदत केली आहे. तिच्याबरोबर काय झाले हे न कळण्याची चिंता आणि ताण त्रासदायक होता,”असेही कॅरीने स्पष्ट केले.
हेही वाचा – “आता विसाव्याचे क्षण!”, ६० वर्षात पहिल्यांदाच सुट्टी घेऊन बर्फात खेळतेय महिला, लेकाने शेअर केला आईचा हृदयस्पर्शी Video
१७ एप्रिल रोजी, मालक कॅरीला कॅलिफोर्नियातील पशुवैद्यकाकडून कॉल आला की,”मांजरीला क्लिनिकमध्ये नेण्यात आले आहे आणि तिची मायक्रोचिप स्कॅन करण्यात आली.”
पशुवैद्यकाने स्पष्ट केले ब्रँडी नावाच्या ॲमेझॉनची कर्मचारीला रिटर्न पॅकेजमध्ये मांजर सापडली होती त्यानंतर ती क्लिनिकला घेऊन आली. पॅकेजवर एम एक्स क्लार्कचा निवासी पत्ता लिहिलेला होता.
![cat-shipped-in-amazon-return-package-travels-from-utah-to-california-in-6-days-survives-without-food-water-snk-94](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/04/image_8b3bac.png?w=553)
“गॅलेना (मांजर) सापडली आहे हे सांगण्यासाठी मी माझ्या पतीला सांगाण्यासाठी मी धावत गेले. आम्ही आदल्या बुधवारी बाहेर पाठवलेल्या मोठ्या आकाराच्या बॉक्समध्ये तिने उडी मारली असावी. “हा बॉक्सवर ‘खरेदीपूर्वी वापरून पहा’ लिहिले होते आणि कामासाठी वापरणाऱ्या स्टीलच्या टाचा असलेल्या बूटांनी भरलेला होता,”असे कॅरीने स्पष्ट केले.
कॅरी म्हणाली, “कॉलवर पशुवैद्यकाबरोबर बोलल्यानंतर मी ब्रँडीबरोबर देखील बोलले. आम्ही गॅलेना (मांजर) प्रेम करतो आणि ती सापडल्यामुळे आमची चिंता कमी झाली हे ऐकून तिला बरे वाटले.”
हेही वाचा – लंडनच्या रस्त्यावर दिसले मुंबईचे डब्बेवाले? Video पाहून आनंद महिंद्रादेखील झाले थक्क, पाहा काय आहे सत्य
![cat-shipped-in-amazon-return-package-travels-from-utah-to-california-in-6-days-survives-without-food-water-snk-94](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/04/image_6967df.png)
पुढच्या दिवशी कॅरी आपल्या पतीसह कॅलिफॉर्नियाला आपल्या मांजरीला परत आणण्यासाठी गेली. ब्रँडीला भेटण्यासाठी कॅरी खूप उत्साही झाली होती. आपल्या पाळीव मांजरीला शोधल्याबद्दल आणि तिची काळजी घेतल्याबद्दल तिचे आभार व्यक्त करायचे होते. आपल्या पाळीव मांजरीला भेटल्यानंतर कॅरी म्हणाली, “ही पुन्हा झालेली भेट आश्चर्यकारक होती! जेव्हा मी गॅलेनाला पुन्हा पकडालाय गेले गॅलेना झटपट थरथरत थांबली आणि माझ्या कुशीत येऊन शांत झाली
ती तब्येत आधीपेक्षा खराब दिसत होती आणि तिला निर्जलीकरणामुळे थकवा जाणवतो होता पण तरीही तिचे शरीराचे कार्य पूर्णपणे सामान्य होतेआणि ती पूर्णपणे असुरक्षित होती!”
“गॅलेना (मांजर) ज्या बॉक्समध्ये अडकली होती त्यात तिला श्वास घेण्यासाठी थोडी जागा होती. गॅलेनाच्या तिच्या मायक्रोचिपमुळे, ब्रँडीची दयाळूपणा आणि देवाच्या कृपेमुळे वाचली!” असे कॅरीने सांगितले.