मुंबई पोलिस नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्याद्वारे ते मनोरंजक; तर कधी जनजागृतीपर व्हिडीओ, पोस्ट शेअर करीत असतात. अशात मुंबई पोलिसांनी पोलिस ठाण्यामधील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात पोलिसांच्या खुर्चीवर चक्क एक मांजर बसलेली दिसतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर एस. कुडाळकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे; जो मुंबई पोलिसांनी रिपोस्ट केला. या व्हिडीओत लोला नावाची एक काळी आणि पांढरी मांजर दिसतेय. पोलिस ठाण्यामधील गजबजाटात मांजरीचे हे पिल्लू पोलिस निरीक्षक कुडाळकर यांच्या खुर्चीवर येऊन शांतपणे गाढ झोप घेताना दिसते. पण जेव्हा इन्स्पेक्टर हळुवारपणे त्या पिल्लाला दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लोला खुर्चीवरून न उठता तशीच डुलक्या घेत राहते.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेलाय. कारण- लोलाच्या हावभावांमुळे युजर्सचे मनोरंजन होत आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर एस. कुडाळकर हे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात काम करतात. भटक्या प्राण्यांसंदर्भात ते सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करीत असतात.