निसर्गाने बनवलेले नियम सर्वांना सारखेच लागू असले तरी कधी-कधी असे काही दृश्य समोर येतात, जे पाहून हा निसर्ग नियम प्रत्येक सजीवाला वेगवेगळा आहे की काय असा संभ्रम निर्माण होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्हाला न्यूटनचे नियम माहित असतीलच. न्यूटोनियन भौतिकशास्त्रानुसार पृथ्वीवरील सर्व घटकांवर एक गुरूत्वाकर्षणाची शक्ती असते. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून सारेच जण चकित होऊ लागले आहेत. या व्हिडीओमध्ये मांजरीने अशी करामत केलीये की ते पाहून लोक चक्रावून गेले आहेत. तुम्ही सुद्दा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्‍ये एक खट्याळ मांजर दिसून येत आहे. सहसा कोणीही पायऱ्यावर चढून वर जातो किंवा खाली जातो, परंतु या मांजरीने सर्व नियम मोडून उलट नियम बनवण्याचा निर्णय घेतला आहे. वर जाण्यासाठी पायऱ्यांखालची वाट निवडली आहे. मांजरीला अशाप्रकारे पायऱ्या चढून खाली उतरताना पाहण्यात मजा तर येत आहे, पण ही मांजर अशी उलटी लटकून पायऱ्या कशी काय उतरेय ? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम या मांजरीला लागू नाही का…? असा सवाल प्रत्येक जण विचारताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : मोबाईलच्या नादात पोटच्या गोळ्यालाच विसरली, VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल

Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील देण्यात आलीय. ‘गुरुत्वाकर्षण? काय असतं गुरुत्वाकर्षण?’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. पायऱ्यांना उटली लटकलेल्या या मांजरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. प्रत्येक जण या मांजरीची करामत पाहून आवक होऊ लागले आहेत. ही मांजरी पायऱ्यांखाली उटली कशी काय लटकली ? याचा शोध घेताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत प्रत्येकजण आपली उत्सुकता व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : वादळ आलं अन्… ट्रक अगदी कागदासारखा उडाला…Viral Video नंतर मिळाली ३५ लाखाची गाडी

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘कबीर सिंग’ चित्रपटातल्या गाण्यावर या चिमुकलीने असा काही आळवला सूर, ऐकून नेटिझन्स म्हणाले…

या व्हिडीओखालील कमेंट्स देखील तितक्याच मजेदार आहेत. काही लोकांनी तर या मांजरीला ‘स्पायडरकॅट’ म्हटलंय. एका व्यक्तीने लिहिले की, ‘ही खारू ताई आणि मांजर यांचे मिश्रण आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “हे मांजरीचे एक अद्भुत निन्जा तंत्र आहे.” एका व्यक्तीने तर ‘मिशन इम्पॉसिबल’ची धून अप्रतिम वाटेल असं लिहिलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. इतकंच नव्हे तर १८०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला रिट्वीट करत हा व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचवला आहे.