Cat Viral video wearing gulabi saree:सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ अनेकदा चर्चेत असतात. पण, यातले काही व्हिडीओ खास करून लक्षात राहतात. असं म्हणतात, माणसांचं आणि प्राण्यांचं नातं खूप अनोखं असतं, म्हणून काही लोकं प्राण्यांचं पालकत्व स्वीकारतात.

अनेक जण मांजर, श्वान अशा पाळीव प्राण्यांचं संगोपन करतात. अगदी पोटच्या मुलासारखी त्यांची काळजी घेतात, त्यांना हवं-नको ते बघतात. त्यांचे वाढदिवस साजरे करण्यापासून ते त्यांच्या आवडी-निवडी जोपासण्यापर्यंत सगळं अगदी आनंदाने करतात.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक

हेही वाचा… हद्दच झाली! कारवर चढली महिला अन् झालं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

सोशल मीडियावर अशा अनेक प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना आपण अनेकदा पाहतो. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये एका मांजरीने चक्क साडी नेसली आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक माणूस मांजरीला नटवताना दिसतोय. सुरुवातीला तो माणूस मांजरीला गुलाबी साडी नेसवताना दिसतोय. नंतर कमरपट्टा, गळ्यात नेकलेस घालून त्या मांजरीला अगदी गोंडस रूप दिलं आहे. हा व्हिडीओ plowythecat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘कोई इतना खुबसूरत’ हे गाणं मनीमाऊच्या या क्यूट रीलमध्ये जोडलं आहे.

हेही वाचा… हेच ते आप्पा! ‘आप्पाचा विषय लई हार्ड ए’ गाण्यातील आप्पा अखेर सापडलेच, आजोंबाचा स्वॅग पाहून तुम्हालाही बसेल धक्का

युजर्सच्या कमेंट्स (Users Comment)

मनीमाऊचा हा गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “इन्स्टाग्रामवरील सर्वात सुंदर मुलगी”, तर दुसऱ्याने लिहिलं, “कृपया तिला बिंदीपण लावा.” तर एकाने “किती क्यूट दिसतेय ही” अशी कमेंट केली.

हेही वाचा… रील्ससाठी कायपण! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तरुणीने केला डान्स, VIDEOतून पाहा किळसवाणा प्रकार

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडीओला तब्बल ९.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत, तर ३ लाख ६६ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. याआधीही या मनीमाऊने शर्ट, ड्रेस आणि लेहेंगा चोळीदेखील परिधान केली आहे. या मांजरीचं नाव plowy असून ती अनेक जाहिरातींमध्ये झळकली आहे.

Story img Loader