सोशल मीडियावर या ना त्या कारणाने प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी प्राण्यांची मस्ती, तर कधी त्यांनी केलेल्या गोष्टी पाहून आश्चर्य व्यक्त केलं जातं. असाच एका मांजरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ख्रिसमस सण जवळ आला असताना गिफ्ट पॅक करण्याची लगबग सुरु आहे. मात्र गिफ्ट पॅक करताना मांजरींचा दंगा पाहून नेटकरी चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.
हा व्हिडिओ सांताचा छोटा मदतीनस या कॅप्शनसह शेअर केला आहे. व्हिडिओत एक महिला गिफ्ट पॅक करताना दिसत आहे. तर मांजर तिला तसं करण्यापासून रोखत आहे. गिफ्ट बॉक्समध्ये जाऊन उभी राहते. तेव्हा ती महिला तिला बॉक्समधून बाहेर काढते. मात्र मांजर पुन्हा दुसऱ्या बॉक्स जाऊन आडवी पडते. त्यानंतर मांजरीला गिफ्ट पॅक करायच्या कागदात गुंडाळल्याचं दिसत आहे. मांजरीला पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
हा व्हायरल व्हिडिओ हजारो नेटीझन्सनी पाहिला आहे. ख्रिसमस जवळ आल्याने या व्हिडिओला आणखी वजन मिळालं आहे. एका युजर्सने लिहीलं आहे की, माझ्याकडे अशीच मांजर होती आणि ती मला मदत करायची. तर दुसऱ्या युजर्सने लिहीलं आहे की, बॉक्समध्ये पडल्याचा क्षण एकदम मस्त आहे.