Viral video: औरैया येथील बिधुना येथील सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या रुग्णालयातील एका तरुणाला आपल्या बहिणीचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळू शकली नाही. अशा स्थितीत त्याला अक्षरश: मृतदेह पाठीला बांधून दुचाकीवरून न्यावा लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून आता तो व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशातील आरोग्य सेवेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बहिणीला वाचवण्यासाठी भावाची तळमळ
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील औरैयाच्या बिधुना येथील नवीन बस्ती येथे राहणारे प्रबल प्रताप सिंह यांची मुलगी अंजली हिने मंगळवारी सकाळी पाणी गरम करण्यासाठी बादलीत हिटर टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला विजेचा धक्का बसून ती गंभीररित्या भाजली गेली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांना मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली, मात्र डॉक्टरांनी येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले.
ह्रदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
यानंतर हतबल झालेल्या भावाने बहिणीचा मृतदेह दुचाकीवर ठेवला आणि त्याच्या पाठीला ओढणीनं बांधला. यानंतर त्याने लहान बहिणीला मागे बसवले आणि घराकडे निघाले. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले. प्रत्येक व्यक्ती सरकारच्या आरोग्य सेवेला शिव्याशाप देताना दिसत होती.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “एकतर हत्ती चिरडून टाकेल किंवा आमचा कायदा” हत्तीसोबत मस्ती करणं आलं अंगलट; वन अधिकाऱ्यांनी दिली ताकीद
उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या एक्स @INCUttarPradeshया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसंच या घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील आरोग्यसेवेची झालेली दुरवस्था समोर आली आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात यावा. तसेच यामधील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे