राजस्थानमधील माउंट अबू येथील एका घराच्या बागेत एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिबट्याने हल्ला केल्यानंतर मालकाने आरडाओरडा केल्याने घाबरून त्याने धूम ठोकली. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बागेतील काळ्या लॅब्राडोर रिट्रीव्हरवर हल्ला करण्यापूर्वी बिबट्याने पेइंग गेस्ट हाऊसची सीमाभिंत ओलांडून उडी मारल्याचे दिसते आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला कुत्रा बागेत फिरत आहे. अचानक एका भिंतीवरून उडी मारून बिबट्या आत शिरतो आणि कुत्र्याच्या अंगावर झेप घेतो. कुत्र्यावर हल्ला करून त्याच्या मानेला चावतो कारण घाबरलेले पाळीव प्राणी मुक्त होण्यासाठी धडपडत असते.

कुत्र्याने बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने काही क्षण तणावपूर्ण चकमक दोघांमध्ये सुरु होती. दरम्यान एका महिलेने तिच्या कुत्र्याच्या उन्मत्त रडण्याचा आवाज ऐकून दार उघडले आणि बाहेर धाव घेतली तेव्हा तिच्या ओरडण्याने बिबट्या घाबरला. त्यामुळे कुत्र्याला सोडून आवारात बिबट्या तेथून पळून गेला. निपचित पडलेल्या कुत्र्‍याला घेऊ घाईघाईने मालक आपल्या घरात गेला.

ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास सनराईज व्हॅली फॉरेस्ट लॉजमध्ये घडली.