आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून एकमेकांशी भांडू लागतात. कपल्सची तर भांडणं नवी नाही, हल्ली जगाचा विसर पडल्यासारखा जोडपी कुठेही भांडू लागतात. सोशल मीडियावर दररोज असे काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये कपल्स एकमेकांशी भांडताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल कारण यामध्ये एक कपल भांडता भांडता तिसऱ्या मजल्यातून थेट खाली कोसळतं.
कधी काय होईल याचा खरंच नेम नसतो. या क्षणाला सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी पुढच्याच क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. असाच प्रकार एका कपलसोबत घडला.
व्हिडिओमध्ये दिसत आहे, दोन कपलमध्ये भांडण सुरु आहे, भांडण करताना ते बाल्कनीच्या रेलिंगला धडकतात. यावेळी त्यांच्या धक्क्याने गॅलरीचे रेलिंग तुटते आणि दोघेही तिसऱ्या मजल्यावरुन थेट रस्त्यावर कोसळतात. पुरुष पाठीवर पडतो, तर स्त्री डोक्यावर आपटून जमिनीवर पडते. हा व्हिडिओ खूपच भीतीदायक आहे. दोघेही बाल्कनीतून पडल्यानंतर तेथे उभ्या असलेल्या वाहनांचे हॉर्नही वाजू लागतात.
जोडपे बाल्कनीतून खाली पडले
हा व्हिडिओ रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की दोघांनाही ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर गंभीर दुखापतींवर उपचार करण्यात आले. व्हिडिओ पाहून असे दिसते की रस्ता आणि बाल्कनीमध्ये सुमारे २० ते २५ मीटर अंतर आहे. त्यामुळे त्यांची हाडे मोडली असावीत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “हिंमत असेल तर ‘योगींना’ कॉल करा”; कारला दंड ठोठावल्याने एका हिंदू गटाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, VIDEO व्हायरल
लोक काय म्हणाले?
या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. काही जणांनी व्यथा मांडली, तर टिंगल करण्यात पुढाकार घेणारेही लोक होते. एका युजरने लिहिले की, ‘हे खरंच खूप भीतीदायक आहे. आशा आहे की दोघांचा मृत्यू झाला नाही. दसऱ्या युजरने कमेंट केली की आता हे दोघे कधीच भांडणार नाहीत. काही लोकांनी सांगितले की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना एखाद्या चित्रपटातील सीन सुरू असल्याचा भास झाला.