Viral video: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक अपघातांच्या घटना समोर येत आहेत. सोशल मीडियावरही भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो. यामध्ये अनेक थक्क करणाऱ्या गोष्टीही व्हायरल होत असतात. काही शुल्लक कारणांवरुन वाद होतात मात्र त्याचा परिणाम हा गंभीर होतो. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे, यामध्ये पार्किंगचे पैसे मागितले म्हणून कारचालकाने व्यक्तीला कारमध्ये खेचले १०० मीटरपर्यंत नेले आणि नंतर त्याला कारमधून बाहेर फेकले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
अहमदाबादच्या बापूनगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक कार चालक पार्किंग अटेंडंटला कारमधून जीवघेण्या पद्धतीने घेऊन जातांना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुलाखालील पे-अँड-पार्क सुविधेत काम करणारा एक माणूस पार्किंग शुल्काची मागणी करतो तेव्हा ही घटना घडते. व्हिडिओ जसजसा पुढे जाईल तसतसे व्हायरल क्लिपमधील वाहन चालक कारची खिडकी उघडतो. पार्किंग अटेंडंटला कारचालक गाडीत ओढताना दिसत आहे. नंतर, पार्किंग अटेंडंट कारच्या खिडकीला लटकताना दिसत आहे. १०० मीटरपर्यंत नेल्यानंतर त्याला कारमधून कारचालक बाहेर फेकतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘मिल बैठेंगे तीन यार’; डोंबिवलीतील पठ्ठ्यानं रिक्षामध्ये सुरू केलं वाईन शॉप, Video होतोय तुफान व्हायरल
या घटनेचा सिसीटीव्ही देखील समोर आला असून याद्वारे पोलीस पुढील तपास करत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही संतापले असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय. सर्वच शहरांमध्ये हल्ली पार्किंगची समस्या मोठी बनली आहे. यामुळे पार्किंगवरुन वरचे वर वाद हे होतच असतात.